brutal Fight Dainik Gomantak
गोवा

Usgao Crime News : मारहाणीत बिहारी कामगाराचा मृत्यु; उसगावातील घटना

शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होणार

Rajat Sawant

Tisk Usgao : तिस्क-उसगांव येथील अळंबी पैदास करणाऱ्या कारखान्यातील हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा आज संशयास्पद मृत्यु झाला आहे. फोंडा पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सा करण्यासाठी पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होणार आहे. याबाबत फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

अधिक माहिती अशी की, राजन सहा (मूळ बिहार, वय 35) हा कामगार अळंबी पैदास करणाऱ्या उसगांव येथील फॅक्टरीत काम करीत होता. अन्य कामगारही या फॅक्टरीत काम करीत होते. शनिवार रात्री दोघा कामगारात बाचाबाचीवरून अखेर मारामारी झाली. त्यात राजन सहा हा मारहाणीत जखमी झाला होता. त्याला पिळये-तिस्क येथील हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी पाठविले होते.

जखम मोठी असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी गोमेकॉत पाठविण्यात आले. रविवारी सायंकाळी गोमेकॉत हॉस्पिटलमधून आपल्या उसगांव येथील फॅक्टरीच्या रुममध्ये आला. सोमवारी सकाळी त्याला अस्वस्थ वाटू लागले, तेव्हा पुन्हा एकदा त्याला पिळये-तिस्क येथे उपचारांसाठी जाताना वाटेतच त्याचा संशयास्पद मृत्यू झाला.

फोंडा पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सा करण्यासाठी पाठविला आहे. शवचिकित्सा रिपोर्ट आल्यानतर खून की संशयस्पद मृत्यू हे स्पष्ट होणार आहे. फोंडा पोलिसांनी संशयित म्हणून चुमनकुमार या कामगाराला ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT