Kadamba Bus Accident on Chimbel Junction Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : चिंबल जंक्शनवर कदंब बसच्या धडकेत सायकलस्वाराचा बळी

अपघातानंतर चिंबल जंक्शनपासून ते पणजी बसस्थानकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगाही पाहायला मिळाल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident : पणजीजवळच असलेल्या चिंबल जंक्शनवर आज सकाळी कदंब बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कदंब बसची जोरदार धडक सायकलला बसल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर चिंबल जंक्शनपासून ते पणजी बसस्थानकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगाही पाहायला मिळाल्या.

दरम्यान आज शुक्रवारी भल्या पहाटे तिस्क उसगाव येथील नेस्ले कंपनीजवळ एका अज्ञात वाहनाने ठोकरल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला आहे. अनघा आनंद देसाई असं या 44 वर्षीय महिलेचं नाव असून मृत महिलेचं मूळगाव कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज असल्याची माहिती आहे. ही महिला सध्या तिस्क येथे कामानिमित्त भाड्याने राहत होती. या अपघातानंतर फोंडा पोलिसांनी पंचनामा केला असून तपासही सुरु केला आहे.

दरम्यान गोव्यात दाखल झालेल्या एका पर्यटक तरुणाने स्वत:च्या गळ्यावर चाकू चालवल्याने मडगाव स्थानकावर एकच गोंधळ उडाला. ओडिशामधून गोव्यात आलेल्या सरोज भरिया या 28 वर्षीय पर्यटकाने स्वतःचाच गळा चिरण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थितांनी घडलेला प्रकार पाहून याची माहिती तातडीने मडगाव पोलिसांना दिली. जखमी पर्यटकाला तातडीने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT