Margao Accident Dainik Gomantak
गोवा

Margao Accident: टेम्‍पो अपघातात 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, दोन मुलांना केले पोरके; तीन वर्षांपूर्वीच पत्नीचे निधन

Margao Accident: या अपघातात कुयरो वेळीप यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे आधीच आईच्या निधनाने पोरक्या झालेल्या दोन मुलांवरील वडिलांचेही कृपाछत्र हरपले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Accident: मडगाव येथील एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटजवळ काल पहाटे ३.३० वाजता एका टेम्पोने तेथे उभ्या करून ठेवलेल्या तीन वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात टेम्पोतील वाहक कुयरो वेळीप (वय ५५, मोरपिर्ला, फातर्पा) हे जागीच ठार झाले, तर टेम्पोचालक दीपक गावकर (३१, खोतिगाव) हे गंभीर जखमी झाले. या अपघातात कुयरो वेळीप यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे आधीच आईच्या निधनाने पोरक्या झालेल्या दोन मुलांवरील वडिलांचेही कृपाछत्र हरपले आहे.

या अपघातात टेम्‍पोचे दोन्ही दरवाजे बंद झाल्याने त्‍यात वाहक कुयरो वेळीप, चालक दीपक गावकर हे दोघेही गंभीर जखमी होऊन अडकून पडले. शेवटी अग्निशमन दलाच्‍या जवानांना बोलावून त्‍यांना बाहेर काढण्‍यात आले, परंतु दीपक गावकर हे गंभीर जखमी झाले, तर कुयरो वेळीप हे गतप्राण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कदंब बसस्थानक रस्त्याकडून एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटच्या दिशेने जाणाऱ्या व्यावसायिक टेम्पोच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्या टेम्पोने रस्त्याशेजारी उभ्या करून ठेवलेल्या टाटा एस, ट्रक व अशोक लेलॅंडचा इन्सुलेटेड ट्रक अशा तीन वाहनांना धडक दिली. शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. यात टेम्पोमधील चालक व वाहक अशा दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यात वाहक ठार झाला, तर चालक गंभीर जखमी झाला.

जखमी चालक दीपक गावकर याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तोपर्यंत फातोर्डा पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी तपासाला सुरवात केली. पोलिस निरीक्षक नाथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार कृष्णा नाईक यांनी पंचनामा केला. पोलिस उपनिरीक्षक अमिन नाईक याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. फातोर्डा पोलिसांनी या अपघातप्रकरणी टेम्पोचालक दीपक गावकर याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

‘नो पार्किंग’ फलकाची मागणी

एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटजवळ राधाकृष्ण हॉटेल ते फोल्गा रेस्टॉरंटपर्यंत वाहने उभी करून ठेवण्यात येतात. परिणामी या मार्गावर वाहतूक कोंडी व अपघात घडत आहेत. या रस्त्यावर गाड्या उभ्या करून ठेवण्यास परवानगी देऊ नये. तसेच तेथे ‘नो पार्किंग’ फलक उभारावा, अशी मागणी स्थानिकांनी मडगाव पालिका व फातोर्डा पोलिसांकडे केली आहे.

अर्धा तास दोघेही अडकले टेम्पोत

या अपघातामुळे टेम्पोचे दोन्ही दरवाजे बंद झाल्याने गाडीत अडकलेल्या दोघांनाही बाहेर काढणे तेथे जमलेल्या नागरिकांना अवघड झाले. साधारणतः अर्धा तास ते दोघेही गाडीत अडकून पडले होते. मडगाव अग्निशमन दलाचे जवान व नागरिकांनी मिळून गाडीचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले. रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती. त्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमींची तपासणी केल्यानंतर कुयरो वेळीप यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

World Athletics Championship: नीरज चोप्राचं हुकलं पदक, वॉलकॉटन जिंकलं 'गोल्ड'

"कंगना बकवास बोलते, ती आली तर कानाखाली मारा" काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Hypoglycemia: काय आहे हाइपोग्लायसेमिया? रक्तातील साखर अचानक कमी होणं ठरु शकतं जीवघेणं; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे उपाय

Viral Video: बंगळूरुतील अजब प्रकार! भररस्त्यात गादी टाकून झोपला तरुण; वाहतूक कोंडीचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT