Arpora Nightclub Fire: पोलीस कोठडी संपली, आता न्यायालयीन कोठडी; म्हापसा कोर्टाचा लुथरा बंधूंना झटका, 9 जानेवारीपर्यंत राहावं लागणार गजाआड

Saurav Luthra & Gaurav Luthra remanded to Judicial Custody: सौरव लुथरा आणि गौरव लुथरा यांना म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मोठा धक्का दिला.
Goa Fire News | Nightclub Fire Case
Luthra brothers nightclub caseDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: हडफडे येथील भीषण अग्निकांड प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सौरव लुथरा आणि गौरव लुथरा यांना म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मोठा धक्का दिला. न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना 9 जानेवारी 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली.

न्यायालयाचा निर्णय

सोमवारी (29 डिसेंबर) झालेल्या सुनावणीदरम्यान, संशयितांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुढील तपासासाठी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला. आता 9 जानेवारीपर्यंत या दोघांना न्यायालयीन कोठडीत रहावे लागणार आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर लुथरा बंधूंना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला.

Goa Fire News | Nightclub Fire Case
Arpora Nightclub Fire: 25 जीव जळाले, पण मालक मिळेना! हडफडे नाईट क्लब अग्निकांडाचा 'सस्पेन्स' वाढला; संशयितांची जबाबदारी झटकण्यासाठी पळापळ

काही दिवसांपूर्वी हडफडे येथील प्रसिद्ध क्लबला लागलेल्या आगीत 15 निष्पापांचा मृत्यू झाला होता. इतकेच नव्हेतर या आगीत मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचेही नुकसान झाले होते. या दुर्घटनाप्रकरणी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका लुथरा बंधूंवर ठेवण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून सौरव आणि गौरव लुथरा यांना अटक केली होती. आगीचे स्वरुप आणि त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना सुरुवातीला पोलीस कोठडीत घेतले होते.

Goa Fire News | Nightclub Fire Case
Arpora Nightclub Fire: 'बर्च' मधील मृत कामगारांना मिळाली नाही नुकसान भरपाई, 'मानवाधिकार'कडून कामगार आयुक्तांना नोटीस

कायदेशीर पेच वाढला

या अग्निकांडामुळे हडफडे परिसरात खळबळ माजली होती. स्थानिकांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी केली होती. लुथरा बंधूंवर निष्काळजीपणा आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याचे गंभीर आरोप आहेत. पोलीस आता फॉरेन्सिक रिपोर्ट आणि अग्निशमन दलाच्या अहवालाची वाट पाहत आहेत, ज्यावरुन आगीचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट होईल. या न्यायालयीन कोठडीमुळे आरोपींच्या जामीन अर्जावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com