Margao Accident : कणकवली येथे कार उलटून मडगावातील सात प्रवासी जखमी

Margao Accident : दुभाजकाला धडक : चालकाला डुलकी लागल्याने अपघात
Margao Accident :
Margao Accident :Dainik Gomantak

Margao Accident :

पणजी मुंबई-गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे पहाटे ५ वा.च्या सुमारास कार उलटल्यामुळे ७ प्रवासी जखमी झाले. डुलकी लागल्‍याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्‍यानंतर कार महामार्गावरील दुभाजकाला आदळली.

ही कार मडगाव ते मुंबई अशी जात होती. अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मडगाव येथील प्रवासी कारमधून मुंबईच्या दिशेने जात होते. हळवल फाटा येथे कार आली असता डुलकी लागल्‍याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यात कार दुभाजकाला आदळून उलटली. या अपघातामध्ये कारमधील बेगम महमंद हनिफ चौकापूर (४०), आयान मुकत्यार गन्नेवाले (१४), मौला गुलाबसाब शिगाली (२८), बाशिरा मम्मदगौस हवालदार (७२), अमीर मम्मदगौस हवालदार (३३), आलिया महाबुसाल शिगाली (११),

Margao Accident :
Prarthana Behere in Goa: प्रार्थनाचा किलर अंदाज चाहत्यांना करतोय घायाळ

पाईजा जापर कुमुमय (११, सर्व रा. मडगाव) हे जखमी झाले. अपघातानंतर सर्व जखमींना कणकवली उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल करण्यात आले. येथील पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. अपघाताची तक्रार चालक अमीर मम्मदगौस हवालदार याने पोलिसांत दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com