'बहुमताचा कल पाहूनच निर्णय घेणार'; चिंबल उपोषणावर ZP गौरी कामत यांची सावध भूमिका!

Chimbel Hunger Strike: या आंदोलनामुळे राज्याचे राजकीय आणि पर्यावरणीय वातावरण तापले असून, लोकप्रतिनिधींनी यावर घेतलेली सावध भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.
Gauri Kamat on Chimbel protest
Gauri Kamat on Chimbel protestDainik Gomantak
Published on
Updated on

चिंबल: गोव्यातील चिंबल भागात सध्या विकासाच्या प्रकल्पावरून मोठे वादंग निर्माण झालेत. ऐतिहासिक तोय्यार तलाव आणि परिसरातील पाणथळ जागा वाचवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसलेय. या आंदोलनामुळे राज्याचे राजकीय आणि पर्यावरणीय वातावरण तापले असून, लोकप्रतिनिधींनी यावर घेतलेली सावध भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.

जिल्हा पंचायत सदस्य गौरी कामत यांचा 'वेट अँड वॉच' पवित्रा

या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर, उत्तर गोवा जिल्हा पंचायत सदस्य गौरी कामत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केले की, चिंबल येथील प्रकरणाचा त्या आधी सखोल अभ्यास करतील आणि त्यानंतरच आपली अधिकृत भूमिका मांडतील.

"मी बहुमतासोबत उभी राहीन," असे विधान करत त्यांनी सध्यातरी कोणत्याही एका बाजूने कौल देणे टाळले आहे. तसेच, या संदर्भात त्या लवकरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार असून, लोकांसाठी काय हिताचे आहे हे पाहण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Gauri Kamat on Chimbel protest
Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल स्थानिकांसाठी महत्वपूर्ण'! खंवटेंचे प्रतिपादन; रोजगारांच्या संधी निर्माण होणार असल्याचा केला दावा

न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन आणि प्रशासकीय अनास्था

आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांचा सर्वात मोठा आरोप प्रशासकीय पारदर्शकतेवर आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रकल्पाबाबत न्यायालयात याचिका प्रलंबित असताना आणि न्यायालयाने काही विशिष्ट निर्देश दिलेले असतानाही, स्थानिक पंचायत आणि संबंधित प्राधिकरणांनी बांधकामाला परवानगी दिली.

हा केवळ न्यायालयाचा अवमान नसून लोकशाही मूल्यांची पायमल्ली आहे, असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. यापूर्वी चिंबल ग्रामसभेने या प्रकल्पाविरोधात एकमताने ठराव मंजूर केला होता, तरीही जनतेच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ऐतिहासिक तोय्यार तलावाचे महत्त्व आणि पर्यावरणीय धोका

चिंबल येथील तोय्यार तलाव हा केवळ एक पाण्याचा साठा नसून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. एकेकाळी या तलावातून पणजी शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असे. या तलावाचा परिसर आणि आजूबाजूच्या पाणथळ जागा जैवविविधतेने नटलेल्या आहेत. पर्यावरणवाद्यांनी इशारा दिलाय की, या भागात मोठे बांधकाम झाल्यास नैसर्गिक जलस्रोत नष्ट होतील आणि पावसाळ्यात पूर येण्याचा धोका वाढेल. "आम्ही कोणत्याही परिस्थितीत तोय्यार तलाव आणि येथील निसर्गचक्र उद्ध्वस्त होऊ देणार नाही."

गोव्यातील वाढता लोकक्षोभ

चिंबलचे हे आंदोलन गोव्यातील वाढत्या नागरी जागृतीचे प्रतीक मानले जातेय. राज्यात गेल्या काही काळापासून पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्रकल्पांविरोधात जनतेचा आवाज बुलंद होत आहे. चिंबल येथील ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत बांधकाम थांबवले जात नाही आणि न्यायालयाच्या आदेशांचा मान राखला जात नाही, तोपर्यंत हे उपोषण आणि आंदोलन सुरूच राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com