Goa Board 12th Result 2022  Dainik Gomantak
गोवा

Goa HSSC Result 2023 : सांगेचा 98.63, तर सत्तरीचा 82.98 टक्के

101 जणांना 33 टक्क्यांपेक्षा कमी गुण : 2 हजार 371 विद्यार्थ्यांना 80 टक्क्यांवर गुण

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 95.46 टक्के लागला असून, गतवर्षीपेक्षा (2022 मध्ये 92.66) 2.8 टक्क्यांनी वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बारा तालुक्यांच्या निकालाची टक्केवारी लक्षात घेतली तर सांगे तालुक्याचा ९८.६३ टक्के निकाल लागला असून, सर्वात कमी निकाल सत्तरी तालुक्याचा ८२.९८ टक्के लागलेला आहे. मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.

बारावीच्या २०२२-२३च्या परीक्षेसाठी १९ हजार ३७७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १८ हजार ४९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर २०२१-२२ च्या परीक्षेसाठी १८ हजार ११२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १६ हजार ७८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावरून दोन्ही वर्षांची तुलना केली तर नियमित परीक्षा देणाऱ्यांमध्ये १,२६२ विद्यार्थी अधिक होते, तर उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या १,७१४ एवढी अधिक आहे.

या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवर नजर टाकली तर ३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्यांमध्ये १०१ विद्यार्थी आहे. ८१ ते १०० टक्के गुण मिळविणाऱ्यांची संख्या २,३७१ एवढी असल्याचे नोंदले आहे.

याशिवाय सामाजिक वर्गानुसार निकाल पाहिला तर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वाधिक ९६.९० टक्के एवढी आहे. ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या ९६.१२, सर्वसाधारण गटातील ९५.१२, तर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची संख्या ९२.४१ टक्के आहे. गेल्या तीन-चार वर्षांनंतर हा सर्वात चांगला निकाल लागला आहे.

डिचोली शांतादुर्गा विद्यालयाचा निकाल ९७.१९ %

बारावीच्या परीक्षेत डिचोलीच्या श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी या विद्यालयाचा बारावीचा निकाल ९७.१९ टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल ९९ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९०.०३ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल ९९.०८ टक्के लागला आहे.

व्यावसायिक शाखेचा निकाल ८७.३५ टक्के लागला आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि व्यवस्थापन मंडळाने यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकवर्गाचे अभिनंदन केले आहे.

क्रीडा गुण घेणारे ३,२८५ विद्यार्थी

या परीक्षेत क्रीडा गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३,२८५ एवढी आहे. या क्रीडा गुणवत्ता गुणांच्या मदतीने परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या केवळ ८४ राहिली आहे. म्हणजेच या गुणांच्या मदतीने परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी केवळ ०.४३ टक्के एवढी राहिली आहे.

कुंकळ्ळी उ.मा.चा निकाल ९८ टक्के

कुंकळ्ळी येथील कुंकळ्ळी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी बजाली. कला शाखेचा ९९%, वाणिज्य शाखेचा ९७%, विज्ञान शाखेचा ९८% व व्यावसायिक शाखेचा ९९% निकाल लागला.

‘हरमल पंचक्रोशी’चा निकाल ९८.३५ टक्के

बारावीच्या परीक्षेत हरमल पंचक्रोशी हायर सेकंडरीचा निकाल ९८.३५ टक्के लागला आहे. संस्थेच्या या यशाबद्दल चेअरमन तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुणवंत विद्यार्थी व शिक्षकवर्गाचे अभिनंदन केले आहे. यंदाच्या परीक्षेत विज्ञान शाखेत ९५.४५ टक्के, कला शाखेत १०० टक्के, वाणिज्य शाखेत ९५.४५ टक्के व व्यावसायिक विभागातील दोन्ही शाखांत १०० टक्के निकाल लागला.

गुणावलोकन

३३% कमी - १०१ विद्यार्थी

९११ विद्यार्थी- ३३ ते ४५ %

५,७०३ विद्यार्थी- ४६ ते ५९ %

१०,२९१ विद्यार्थी- ६० ते ८० %

२,३७१ विद्यार्थी- ८१ ते १०० %

कोरगावच्या ‘कमळेश्वर’चाही उत्कृष्ट निकाल

बारावीच्या परीक्षेत कोरगाव येथील श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला शाखेचा १०० टक्के व वाणिज्य शाखेचा ९८ टक्के निकाल लागला. या विद्यालयातून कला शाखेतून ६२ व वाणिज्य शाखेतून ४६ मिळून १०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

कला शाखेत अनिषा कुएल्हो- ८९.६७% (प्रथम), अपेक्षा परब- ७८.६७% (द्वितीय) तर सानिया गवंडी- ७४.८३% (तृतीय) आली. वाणिज्य शाखेत नरेश चौधरी- ८७% (प्रथम), एकनाथ केरकर- ८२.३३% (द्वितीय), रकीनंद गवंडी- ८१.५० टक्के तृतीय आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

तरुणांसाठी 'म्हजी बायल' योजना! दिवाळीनंतर उडणार लग्नांचे बार; सिधुदत्त कामतांचा मजेशीर Video Viral

SCROLL FOR NEXT