Goa Drug Case
Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: 5 वर्षांत 949 ‘ड्रग्स पेडलर्स’ना अटक!

दैनिक गोमन्तक

Goa Drug Case: पाच दिवसांपूर्वी शिरसई - बार्देश येथे तब्‍बल बारा किलो वजनाच्‍या गांजासह तीन बिहारी अल्‍पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली. त्‍यांच्‍याकडे सापडलेल्‍या गांजाची किंमत बारा लाख रुपये एवढी होती.

या घटनेमुळे गोव्‍यात अमलीपदार्थाचा सुळसुळाट अजूनही चालू असून आता त्‍यासाठी अल्‍पवयीन मुलांचाही वापर केला जातो ही गंभीर बाब पुढे आली आहे. मात्र, गोव्‍यात हे अमलीपदार्थ कुणाच्‍या मार्फत येतो याच्‍या मुळापर्यंत जाण्‍यास गोवा पोलिसांना अजूनही अपयश आलेले आहे.

२०१८ ते २०२३ (जूनपर्यंत) या कालावधीत एनडीपीएस कायद्यांतर्गत गोव्‍यात ९४९ प्रकरणे नोंदवण्यात आली. तथापि, पोलिसांना कोणत्याही प्रकरणात अमलीपदार्थ पुरवठादार किंवा बेकायदेशीर ड्रग्सच्या स्त्रोतांचा माग काढता आलेला नाही.

उलट फक्‍त ड्रग्‍सच्‍या विक्रीचे केंद्र बनले आहे. येथे ड्रग्‍स तयार केले जात नाहीत अशा आशयाची उत्तरे यापूर्वी खुद्द पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी केली आहेत. या ९४७ प्रकरणांपैकी ७३९ खटले प्रलंबित आहेत, तर ११७ प्रकरणांचा तपास सुरू आहे.

आठ प्रकरणांमध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे, तर ३९ प्रकरणांत दोषी ठरले आहेत. २५ प्रकरणांमध्ये संशयितांवरील खटले मागे घेतले आहेत.तपासादरम्यान, संशयित व्यक्ती सहकार्य करत नाही किंवा स्त्रोत उघड करत नाही. त्‍यामुळे पोलिसांना ड्रग्ज तस्करांचा मागचा-पुढचा संबंध शोधून काढण्‍यास अडचणी येत आहेत असे सांगण्‍यात येते.

गोवा हे ड्रग्‍सचे प्रमुख केंद्र झाले आहे. गोव्‍यातून देशातील इतर भागात ड्रग्‍स पुरविले जातात. हैद्राबाद पोलिसांनी यापूर्वी केलेल्‍या कारवाईत ही बाब उघड झाली आहे. गोव्‍यात ड्रग्‍स गावागावांत पोचले आहेत. अशा स्‍थितीत या ड्रग्‍स व्‍यावसायिकांची पाळेमुळे खणून काढण्‍याऐवजी गोवा पोलिस फक्‍त काही किरकोळ पेडलर्सना अटक करण्‍यातच धन्‍यता मानत आहेत.
- विजय सरदेसाई, अध्‍यक्ष, गोवा फॉरवर्ड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon 2024: अंजुणे धरणाचे चारही दरवाजे खुले, कोकण रेल्वेच्या 4 गाड्या रद्द; पावसाबाबत महत्वाच्या अपडेट

Wall Collapses At Navelim: कुंपणाची भिंत कोसळून नावेलीत दुचाकीचे नुकसान

Goa Assembly Monsoon Session 2024: पत्नीच्या नातेवाईकाचा खून आमदार पतीने थेट विधानसभेत मांडली लक्षवेधी

Goa Tourism: पर्यटक प्रोत्साहन विधेयकावर टीटीएजीकडून सूचना सादर

Goa assembly monsoon session 2024 Day 2: माफीवरुन गोंधळ, गुन्हेगारीबाबत लक्षवेधी; विधानसभेत आज काय घडले? वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT