Margao Master Plan: मडगावचा मास्टर प्लॅन दुसऱ्यांदा तयार करण्याचे प्रयोजन काय?

जीसुडाने प्रस्ताव मांडल्याने नागरिकांना पडला प्रश्न
Margao Municipality
Margao MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

GSUDA Proposal For Margao Master Plan: गोवा राज्य नगर विकास मंडळाने (जीसुडा) मडगावचा मास्टर प्लॅन तयार करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. २०१३-१४ साली तयार केलेला मडगावचा मास्टर प्लॅन कागदावर असताना दुसऱ्यांदा मास्टर प्लॅन तयार करण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्र्न नागरिकांना पडलेला आहे.

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी देशाच्या संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्याबरोबर राज्य सरकारने मडगावचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी स्पेन येथील एका कंपनीला पाचारण केले होते.

ऑक्टोबर २०१४ साली सल्लागार कंपनीच्या अभियंत्यांनी मडगावला चारवेळा भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी अनेकांशी चर्चा केली.

Margao Municipality
Pernem Zoning Plan: राजकीय संघर्षामागे नक्की कोणाचा हात?

शिवाय सार्वजनिक बांधकाम खाते, एसजीपीडीए जमीन सर्वेक्षण विभाग, पोलिस इत्यादी सरकारी संस्थांकडून त्यांनी माहिती गोळा करून घेतली.

त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये हा मास्टर प्लॅनचा प्रयत्न सोडून देण्यात आला. त्यावेळी रिंग रोड पूर्ण करणे, ईस्टन बगल रस्ता, पश्र्चिम बगल रस्ता पूर्ण करणे, वाहतूक टर्मिनस, पायी चालण्यासाठी रस्ते इत्यादीचा प्रस्ताव त्यात होता.

शॅडो कौन्सिलने उपस्थित केला प्रश्र्न

या मास्टर प्लॅनवर शॅडो कौन्सिलने प्रश्र्न उपस्थित केला असून ओडीपी अस्तित्वात असताना मास्टर प्लॅनची गरज काय, असा प्रश्र्न आर्किटेक्ट कार्लोस ग्रासियस यांनी उपस्थित केला आहे.

मास्टर प्लॅन तयार असताना कायद्यात सर्वसमावेशक विकास योजना तयार करण्याची तरतूद असल्याचे ग्रासियस यांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com