Jelly Fish Dainik Gomantak
गोवा

Jelly Fish: गोव्यात समुद्रकिनाऱ्यांवर जेलिफिश चावण्याच्या घटनांमध्ये वाढ; तब्बल 850 प्रकरणांची नोंद

जेलिफिश हा मासा सहजासहजी जास्त विषारी नसतो, परंतु त्याचा दंश माणसाच्या त्वचेवर खाज आणतो.

दैनिक गोमन्तक

Jelly Fish: समुद्रकिनाऱ्यांवर जेलिफिश आढळण्याचे प्रकार अलीकडे वाढलेले आहेत. त्याशिवाय या जेलिफिशकडून मागील तीन महिन्यांत 850 जणांना दंश झाल्याची नोंद दृष्टी जीवरक्षक दलाकडे झाली आहे. जेलिफिश हा मासा सहजासहजी जास्त विषारी नसतो, परंतु त्याचा दंश माणसाच्या त्वचेवर खाज आणतो किंवा माणसाला चीडचीड आणणारा ठरतो.

मागील तीन महिन्यांत एकूण 850 जेलिफिशची प्रकरणे नोंदविली, त्यात 140 उत्तर गोव्यात आणि 710 दक्षिण गोव्यामध्ये घडली आहेत. उत्तर गोव्यात कळंगुट, बागा आणि सिकेरी येथे अनुक्रमे 60,60 आणि 20 असे जेलिफिश दंश झाल्याची नोंदणी आहे.

दक्षिण गोव्याच्या संदर्भात सर्वाधिक आकड्यांसोबत (225) बेताळभाटी या समुद्रतटावर जेलिफिशद्वारे चावल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्याशिवाय बाणावली व झालोर या किनाऱ्यांवर प्रत्येकी 50 प्रकरणे घडली आहेत. यासोबत दक्षिण गोव्यात झालेल्या स्वीमथॉन या क्रीडाप्रकारामध्ये एकूण 125 जणांना जेलिफिशचा दंश झाल्याचे नमूद झाले आहे.

दृष्टी जीवरक्षक जेलिफिश हल्ल्यात बळी पडलेल्यांवर व्हिनेगर स्प्रेने उपचार करतात. विषारी द्रव्यांचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावित भागात गरम पाणी लावून उपचार केले जातात.

जेलिफिश टेंटॅकल्स बाहेर काढण्यासाठी चिमट्यांची उपलब्धता आहे. सूचनेसाठी पीए सिस्टमचाही वापर केला जातो.

सावधगिरीचे उपाय

  • जेलिफिशने दंश केल्यास जवळच्या जीवरक्षकाला कळवा किंवा लाइफसेव्हर टॉवरकडे जावा.

  • चावलेला भाग गरम पाण्याने धुवा (आपण सोसण्याइतपत गरम) कारण उष्णतेमुळे विषारी द्रव्ये खाली जातात.

  • वेदना आणि सूज कमी करण्यासाठी चावलेल्या भागावर बर्फ ठेवा.

  • छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या व्यक्तींनी ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT