Goa: साडेआठ लाखांचा अमली पदार्थ जप्त Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: साडेआठ लाखांचा अमली पदार्थ जप्त

मडगाव, वेर्णा येथे क्राईम ब्रँचची कारवाई

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात गांजा विकणाऱ्यांचा सुळसुळाट असून क्राईम ब्रँचने बुधवारी रात्री मडगाव आणि वेर्णा या दोन ठिकाणी छापे टाकून उत्तर प्रदेशमधील दोघा संशयितांना अटक करून 8.58 लाखांचा गांजा जप्त केला.

पहिला छापा बुधवारी रात्री मडगाव स्टेशन रोडवर टाकण्यात आला. पोलिस निरीक्षक फिलोमेना कॉस्ता यांच्या नेतृत्वाखाली पाेलिसांनी राहुल मिश्रा (23) याला अटक केली. त्याची झडती घेतली असता 4.80 किलो गांजा आढळला.

त्याची किंमत 4.80 लाख रुपये होती. संशयित मडगावमधील एका लॉजमध्ये उतरला होता. स्टेशन रोडवर तो गांजा विकण्यास येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. उपनिरीक्षक मार्लन डिसोझा, पोलीस शिपाई विक्रम खानोलकर, सैमुल्ला मकानदार आणि अजय नाईक यांचा कारवाईत समावेश होता. दुसरा छापा बुधवारी रात्री वेर्णा पंचायतीजवळ निरीक्षक फिलोमेना कॉस्ता आणि थेरान डिसोझा यांनी टाकला. यावेळी मनीष सेठ (26) या उत्तर प्रदेशमधील युवकाला अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

Goa Education: अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्‍येत घट; विनाअनुदानित शाळांतील संख्‍येत मात्र सातत्‍याने होतेय वाढ

'Telegram'ला 15 दिवसांचा अल्टिमेटम! चित्रपट आणि OTT कंटेंटप्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका, पायरसीविरोधात मोठं पाऊल

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

Goa Education: 3 वर्षांपासून निधीअभावी अडचणीत असलेल्या 'बाल हक्क आयोगा'ला अखेर सरकारी अनुदान; 'गोमन्तक'च्या वृत्ताची प्रशासनाकडून तातडीने दखल

SCROLL FOR NEXT