Goa Kokani Bhasa Parishad Dainik Gomantak
गोवा

Goa Kokani Bhasha Parishad : इतर राज्यांमध्ये असलेल्या कोकणी भाषिकांना एकत्र आणा : दामोदर मावजो

उदय भेंब्रे यांचा शानभाग जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Kokani Bhasha Parishad : इतर राज्यांमध्ये असलेल्या मूळ गोमंतकीय कोकणी भाषिकांना शोधून त्यांना एकत्र आणणे गरजेचे आहे. कोकणी भाषिकांना एकत्र आणण्याचे काम परिषदेने करायला हवे, असे ज्येष्ठ साहित्यिक तथा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांनी यावेळी सुचविले.

अखिल भारत कोकणी परिषदेचा 84 वा स्थापना दिवस गडहिंग्लज इथे शनिवारी साजरा करण्यात आला. त्यावेळी ज्येष्ठ कोकणी साहित्यिक, ॲड. उदय भेंब्रे यांना पहिल्या माधव मंजुनाथ शानभाग जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक तथा ज्ञानपीठ विजेते दामोदर मावजो प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

मावजो यांनी गोव्यासह कर्नाटक, महाराष्ट्र व केरळामध्ये असलेल्या सर्व कोकणी भाषिकांनी एकत्र येऊन एक सांस्कृतिक राज्य तयार करण्याच्या महत्वावर डॉ. भूषण भावे यानी भर दिला. केरळ व कर्नाटकमध्ये कोकणी अकादमी आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने कोकणी अकदमी स्थापावी असेही सूचित केले. सिंधदूर्गचे बिशप फादर ऑल्विन बार्रेटो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी कोकण प्रदेशातील कोकणी संस्कृतीवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. मडगाव येथील रवींद्र केळेकर ज्ञानमंदिरातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या प्रसंगी परिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रिकेचे मान्यवरांहस्ते लोकार्पण करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT