Electricity Problem Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity Problem: काणकोण तालुक्याला वीज खात्याची 84 कोटींची भेट

Goa Electricity Problem: ओव्हरहेड वीजवाहिन्या तातडीने बदलणार

दैनिक गोमंतक

Goa Electricity Problem: वीज खात्याने काणकोण तालुक्याला चतुर्थीची सुमारे 84 कोटीची खास भेट दिली आहे. कुंकळ्ळी ते चार रस्ता उपकेंद्रापर्यंतची करमल घाट क्षेत्रातील ओव्हरहेड वीज वाहिनी बदलून भूमिगत वीज वाहिनी घालण्यासाठी 46 कोटी, तीन लाख 29 हजार रूपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.

पैंगीण व लोलये पंचायत क्षेत्रात भूमिगत वीज वाहिन्या घालण्यासाठी 37 कोटी 97 लाख खर्चाला मंजुरी दिली आहे. या सबंधीची समंती वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस यांनी दिली आहे. करमल घाटातून घनदाट अरण्यातून कुंकळ्ळीहून ही ओव्हरहेड वीज वाहिन्यांद्वारे काणकोणला वीज पुरवठा होतो.

मात्र, पावसाळ्यात या वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्यास अनेक तास काणकोणचा वीज पुरवठा ठप्प होतो.वीज कर्मचाऱ्यांनाही रात्रीच्या वेळी ही घटना घडल्यास तेथे जाणेही शक्य होत नव्हते. यापूर्वी गावडोंगरी व खोतीगाव पंचायत क्षेत्रात व पैगीण पंचायतीच्या काही भागात भूमिगत वीज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत.

आता उर्वरित पैंगीण पंचायत क्षेत्रातील भागात व लोलये पंचायत क्षेत्र भूमिगत वीज वाहिन्यांनी जोडण्यात येणार आहे.त्यामुळे या भागातील खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. या पुढे पालिका क्षेत्र व आगोंद पंचायत क्षेत्रही भूमिगत वीज वाहिन्यांनी जोडण्यात येणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT