Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police : पावणेचार वर्षांत 826 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

26 वरिष्ठ श्रेणीतील तर 64 कनिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या पदांना संमती

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Police : पोलिस खात्यात गेल्या पावणेचार वर्षांत 826 अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यामध्ये अधीक्षक ते उपनिरीक्षकपदापर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या खात्यामध्ये 26 वरिष्ठ श्रेणीतील तर 64 कनिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या पदांना संमती आहे.

त्यातील 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागा तर 30 कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात आल्या आहेत, अशी माहिती आमदार वेंझी व्हिएगश यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्‍नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्तर देताना दिली.

2019 साली पोलिस खात्यातील उपनिरीक्षक व उपअधीक्षक पदावरील 138 जणांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये काहींच्या दोनपेक्षा अधिकवेळा बदल्या झालेल्या आहेत. 2020 साली 139 निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला होता. या दोन्ही वर्षी उपअधीक्षकांच्या बदल्या काढण्यात आल्या नव्हता.

2022 हे निवडणूक वर्ष असल्याने उपअधीक्षकांसह निरीक्षक व उपनिरीक्षक मिळून सर्वाधिक 355 बदल्या काढण्यात आल्या आहेत. यावर्षी 2023 मध्ये 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती उत्तरादाखल देण्यात आली आहे.

2019 138 जणांच्या उपनिरीक्षक व उपअधीक्षक पदावरील बदल्या

2020 139 निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या

2022 355 उपअधीक्षकांसह निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या

2023 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या काढण्यात आल्या आहेत

25 उपअधीक्षकांची स्थिती बिकट

हंगामी बढती दिलेल्या 25 पोलिस उपअधीक्षकांची स्थिती बिकट झाली आहे. रिक्त जागा नसताना बढती देण्यात आल्याने त्यांना नियमित सेवेत घेण्यासाठी सरकारसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत व त्याचे परिणाम या अधिकाऱ्यांना भोगावे लागत आहेत.

पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात येणार होता. मात्र, काहींना त्यांच्या झालेल्या बदल्यांची ठिकाणे मान्य नसल्याने ती बदली यादीच रद्द करण्यात आली होती.

तीन जागा रिक्त

सध्या पोलिस खात्यात पोलिस अधीक्षकांच्या दोन जागा रिक्त झालेल्या आहेत त्या अजून भरण्यात आलेल्या नाहीत. या महिन्यात उद्या आणखी एक पोलिस अधीक्षक बोसुएट सिल्वा हे निवृत्त होत आहेत. त्यामुळे ही संख्या ३ वर गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT