Congress Rebel MLA to Join BJP Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Rebel : कामत, लोबोंसह एकूण 8 काँग्रेस आमदारांची भाजप प्रवेशाची घोषणा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना मायकल लोबो यांनी याबाबत घोषणा केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress Rebel : काँग्रेसच्या आठ आमदारांच्या गटाने आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना मायकल लोबो यांनी याबाबत घोषणा केली आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळाला आम्ही कंटाळलो होतो. त्या पक्षात आपल्याच नेत्यांचे पाय खेचण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं मायकल लोबो यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच आपल्या भाजप प्रवेशामुळे संपूर्ण बार्देश तालुक्यात आनंदाचं वातावरण असल्याचंही लोबो म्हणाले आहेत.

काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे गोव्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. दिगंबर कामत यांनी सलग आठवेळा मडगावमधून विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता कामत भाजपमध्ये आल्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्लाही भाजपच्या ताब्यात आला असल्याचं तानावडेंनी जाहीर केलं आहे. त्यामुळे गोव्यात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी झालं आहे.

विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात काँग्रेस आमदारांनी चर्चा केली. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेस आमदारांच्या गटामध्ये माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यासह अन्य 7 आमदारांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने मायकल लोबो, डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि रुडॉल्फ फर्नांडिस या काँग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT