Goa Election: Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

उत्पल पर्रीकर यांच्याबद्दल काय म्हणतेय जनता...

‘गोमन्तक’च्या डिजिटल टीमचा सर्व्हे : बाबूश मोन्सेरात यांच्याबद्दल नाराजी

Priyanka Deshmukh

पणजी: मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar') यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचे नाव सध्या चर्चेत आहे. मनोहर पर्रीकर असे व्यक्तिमत्त्व होते की, त्यांना केंद्रीय मंत्रिपद सोडून जनतेसाठी आणि पक्षासाठी पुन्हा गोव्यात मुख्यमंत्रिपदी (Goa CM) यावे लागले. आता त्यांचेच पुत्र उत्पल पर्रीकर गोवेकरांच्या मनात किती घर करून आहेत हे बघण्याची वेळ आली आहे. आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या राजकीय ताकदीपुढे उत्पल यांचा ठाव लागणार का? तसेच त्यांना पणजीतून उमेदवारी द्यावी का? याबाबत दै. ‘गोमन्तक’च्या डिजिटल टीमने सोशल मीडियाच्या माध्यमातून काैल घेतला असता गोव्यातील 75 टक्के जनतेने उत्पल पर्रीकर यांना सकारात्मक पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी पणजीतूनच निवडणूक लढवावी, अशीही इच्छा व्यक्त केली आहे.

उत्पल पर्रीकर यांच्याबद्दल काय म्हणतेय जनता...

पणजी मतदारसंघातून उत्पल पर्रीकर यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सध्याचे चित्र आहे. मात्र, त्यांच्याबद्दल एक विशेष वाक्यप्रयोग करण्यात आला. ‘उत्पल यांनी पक्षासाठी भरीव काम करून दाखवावे, त्यांना केवळ पर्रीकरांचे पुत्र म्हणून भाजपची उमेदवारी मिळणार असे होणार नाही,’ असे वक्तव्य गोवा भाजपचे निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी दै. ‘गोमन्तक’शी बोलताना केले होते. मनोहर पर्रीकर यांनी केवळ गोव्यासाठी नाही, तर भाजप पक्ष म्हणून मोठा व्हावा यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी गोव्यासाठी केलेले कामदेखील तितकेच वाखाणण्याजोगे आहे. कारण गोव्यात पर्रीकरांनी जे काम केले, त्यांचे जे कर्तृत्व होते त्याची बरोबरी उत्पल करतील का, असा प्रश्नही एकीकडे उपस्थित होतो.

2017 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतरही उत्‍पल पर्रीकर यांच्या पणजीत भेटीगाठी सुरू होत्या. याही वर्षी उत्‍पल यांचे सक्रिय होणे स्वाभाविक होते आणि तेच झाले. त्यांनी आपल्या मतदारसंघात प्रचार आणि भेटीगाठी घेण्याला सुरवात केली आहे. मी पणजीतून निवडणूक लढणार असेदेखील त्यांनी जाहीर केले आहे. आता आपण निवडणूक लढवणारच, अशी घोषणा केल्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. कारण सध्या पणजी मतदारसंघातील आमदार बाबूश मोन्सेरात हे भाजपात आहेत. मात्र, उत्पल हे बाबूश यांना टक्कर देऊ शकतील का? बाबूश यांच्या राजकीय अनुभवापुढे उत्पल टिकू शकतील का? जनतेचा कल नव्या पिढीकडे असणार की अनुभवी नेत्याकडे? असे अनेक प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी दै. ‘गोमन्तक’च्या डिजिटल टीमने केलेला सर्वे हा उत्पल पर्रीकरांच्याच बाजूने जाताना दिसत आहे.

हे सर्व असले तरी मनोहर पर्रीकर यांनी आपले पुत्र उत्पल पर्रीकर यांना ते हयात असताना कधीच राजकारणात येऊ दिले नाही. तेव्हा आता हे सर्व कल उत्पल यांच्याबाजूने असले तरी आता भाजप पक्षश्रेष्ठी उत्पल यांच्यासारख्या मूळ भाजप कार्यकर्त्याला तिकीट देणार की बाबूश यांच्यासारख्या आयात केलेल्या उमेदवाराला पुन्हा संधी देणार ते येणारा काळच ठरवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT