Ponda Municipal Council Election 2023 Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipal Council Elections 2023 : फोंडा पालिकेसाठी 74.65 टक्के मतदान

किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता तेराही प्रभागांत मतदान प्रक्रिया शांततेत

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा पालिकेच्या निवडणुकीत किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता तेराही प्रभागांत मतदान शांततेत झाले. सायंकाळी उशिरा मिळालेल्या आकडेवारीनुसार फोंडा पालिकेसाठी 74.65 टक्के मतदान झाले.

सकाळी मतदारांची मोठी गर्दी दिसली; पण दुपारपर्यंत मतदानाची प्रक्रिया रोडावली. संध्याकाळी पुन्हा मतदारांनी थोडी गर्दी केलेली दिसली. शुक्रवार हा कामाचा दिवस असल्याने मतदारांनी निरुत्साह दर्शविला. विशेष म्हणजे, सरकारी तसेच इतर कार्यालये सुरूच होती.

प्रभाग क्रमांक ७ व १३ मध्ये बिनविरोध निवड झाली आहे. मतदानावेळी भाजप पुरस्कृत फोंडा नागरिक समिती तसेच रायझिंग फोंडा या दोन पॅनेलमध्येच अटीतटीचा सामना झाला. काही ठिकाणी पॅनेलविरहीत स्वतंत्र उभे राहिलेल्यांनीही आपला दरारा कायम ठेवला आहे. त्यामुळे नेमके कोण निवडून येईल, हे सांगणे कठीण आहे. तरीही प्रत्येक उमेदवाराने आपणच निवडून येणार असल्याचा दावा केला आहे.

निवडणुकीसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनीही मतदानावेळी फेरफटका मारून परिस्थितीचा अंदाज घेतला. मतदानावेळी काही प्रभागांत संबंधित उमेदवारांच्या समर्थकांनी मतदान बूथजवळ गर्दी केल्याने त्यांना संबंधित निवडणूक अधिकारी व पोलिसांनी हटवले. त्यावेळी किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडले.

युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फोंडा पालिका निवडणुकीत युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसला. ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्रथम प्राधान्य असल्याने त्यांनाही मतदान करणे सोयीस्कर ठरले. युवा मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचे दिसले. त्यामुळे बऱ्याच प्रभागांत युवा मतदारांवरच संबंधित उमेदवारांची भिस्त असल्याचे जाणवले.

"फोंडा पालिकेला मतदान म्हणजेच विकासाला मतदान असून मतदार सूज्ञ आहेत. त्यांना विकास म्हणजे काय हे माहीत आहे. विकासासाठी सत्तेवर असलेल्या सरकारलाच पाठिंबा देणे योग्य असल्याचे मतदारांना ठाऊक आहे. त्यामुळे फोंडा नागरिक समितीचेच उमेदवार निवडून येतील."

रवी नाईक, आमदार तथा कृषिमंत्री, फोंडा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

रेस्टॉरंटमध्ये अचानक घुसला 'छोटा' पाहुणा, कर्मचाऱ्याने प्रेमाने दिला नाश्ता; हृदयस्पर्शी Video Viral

Goa Assembly Session: गोव्यात पर्यटक घटले! सरकारने आत्मचिंतन करावे- विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT