Gruhkalyaan Yojana Goa Dainik Gomantak
गोवा

Ladli Lakshmi Yojana: गरवंतांची प्रतीक्षा कायम! 'लाडली लक्ष्मी', 'गृहआधार'चे १७,४६५ अर्ज प्रलंबित

Goa News: सध्या राज्यात लाडली लक्ष्मी आणि गृहआधार योजनांचे तब्बल १७,४६५ अर्ज गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि यामुळे अनेक गरजवंताची फरपट होतेय

गोमन्तक डिजिटल टीम

Gruhkalyaan Yojana Goa

पणजी: सध्या राज्यात लाडली लक्ष्मी आणि गृहआधार योजनांचे तब्बल १७,४६५ अर्ज गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि यामुळे अनेक गरजवंताची फरपट होतेय. एकूण १४,००९ लाडली लक्ष्मीचे अर्ज आणि ३,४५६ गृहआधाराचे अर्ज मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी पावसाळी अधिवेशनात एका योजनेची घोषणा केली होती. या घोषणेनुसार राज्यातील विधवा महिलांना गृहआधारचे १५०० व विधवा कल्याण समाज योजनेअंतर्गत २५०० असे एकूण ४००० रुपये दिले जातील, मात्र याची अद्याप कार्यवाही झालेली नाही.

गेल्या आर्थिक वर्षात गृहआधारेच सर्वाधिक ३९२ अर्ज केपे मदारसंघातून तर सर्वात कमी ४५ अर्ज दाबोळी मतदारसंघातून मंजूर झालेत. लाडली लक्ष्मीचे सर्वात अधिक २३७ अर्ज फोंडा मदादारसंघातून तर सर्वात कमी ६७ अर्ज ताळीगाव मधून मंजूर झाले आहेत.

गोवा फॉर्वड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या मते मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्याचं अशा गृहकल्याण योजनांकडे लक्ष असायचं. गरजवंतांचे अर्ज मंजूर होत नाहीये किंवा मंजूर झालेल्या अर्जांवर पैसे न मिळणं ही खेदजनक बाब आहे. सरकार इव्हेन्टवर अधिक पैसे खर्च करतंय तर गरजू लोकांचे अर्ज मात्र प्रलंबित ठेवले जातायत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT