Margao Accident  Dainik Gomantak
गोवा

Margao Accident: ट्रकच्या धडकेत 73 वर्षीय चुरमुरे विक्रेत्याचा मृत्यू, दांडेवाडी-चिंचणी येथील घटना

याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Margao Accident: दांडेवाडी-चिंचणी येथे ट्रकची धडक बसल्याने वृद्ध सायकलस्वार मकबूलसाब मुदेनूर (73) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.14) सकाळी 09 वाजता ही घटना घडली.

या ट्रकची धडक बसल्याने जखमी अवस्थेत असलेल्या मकबूलसाब यांना मडगाव जिल्हा इस्पितळात आणले असता त्यांना मृत जाहीर करण्यात आले.

कुंकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकबूलसाब हे कुंकळ्ळी येथे राहात होते आणि सायकलवरूनच चुरमुरे विकण्याचे काम करत होते. सकाळी ते मडगाव येथे साहित्य विकायला जात होते.

त्यावेळी एका रंबलरवरून सायकल पुढे नेत असताना त्यांना पाठीमागून ट्रकची धडक बसली. हा रंबलर सदोष असल्याने अपघात झाला, असे सांगण्यात येते. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.

कुंकळ्ळी पोलिसांनी ट्रक चालक रवी रामेश्वर सिंग (वय 35, रा. पणजीपुरा, राजस्थान) याला अटक केली आहे.

चालक अपघातानंतर गाडीसह पळ काढत होता. नागरिकांनी ट्रक अडवला तरी देखील चालकाने ट्रक सोडून पळ काढत होता. दरम्यान, कुंकळ्ळी पोलिसांनी मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत चालकाला अटक केलीय. पुढील तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

Diwali 2025: पणजीत कारीट खातेय भाव! दिवाळी खरेदीसाठी गर्दी वाढली; आकाशकंदील, पणत्यांना मागणी

वीज कोसळून कर्नाटकच्या व्यक्तीचा गोव्यात मृत्यू? कोलवा येथे भाड्याच्या खोली बाहेर आढळला मृतदेह

अग्रलेख: भारतात पावसाच्या एका तडाख्यातच डांबर, खडी, सिमेंट अदृश्य का होऊन जाते?

Goa Today's News Live: फोंड्यात थंड पेयाच्या सीलबंद बाटलीत आढळली मिरची पूड

SCROLL FOR NEXT