venzy veigas Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha: गोव्यात 70 टक्के लोक भाजप विरोधात; आप आमदार वेंझी व्हिएगस यांचा दावा

Goa Loksabha Election: आम आदमी पक्षाने आघाडीला समर्थन दिल्याने पक्षाचे आमदार आघाडीच्या नेत्यांचा प्रचार करत आहेत.

Pramod Yadav

Goa Loksabha Election

गोव्यात इंडिया आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर प्रचाराने वेग घेतला आहे. राज्यात भाजप, काँग्रेस आणि आरजीच्या उमेदवारांचा जोरात प्रचार सुरु आहे. आम आदमी पक्षाने आघाडीला समर्थन दिल्याने पक्षाचे आमदार आघाडीच्या नेत्यांचा प्रचार करत आहेत.

बाणावलीचे आमदार दक्षिणेत काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस यांचा प्रचार करत असून, राज्यात 70 टक्के लोक भाजप विरोधात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

इंडिया आघाडीच्या प्रचारानिमित्ताने मी दक्षिण गोव्यातील 15 मतदारसंघात फिरलो आहे. लोक भाजपला कंटाळली असून, 70 टक्के लोक भाजप विरोधात आहेत. राज्यातील लोक अनिश्चितता आणि महागाई या सारख्या समस्यांचा सामना करत असल्याचे व्हिएगस म्हणाले.

भाजप नेते देखील पक्षाच्या बैठकांसाठी जातायेत त्यांना चढ्या दराने पेट्रोल भरावे लागत आहे. घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. सर्वत्र भाजप नेतृत्वातील सरकारच्या विरोधात वातावरण पाहायला मिळत आहे, असे व्हिएगस म्हणाले.

किनारी भागात राहणारे नागरिक त्यांचे घर केव्हाही तोडले जाऊ शकते या भीतीखाली जगत आहेत, सीआरझेड प्रकरणी कोणतेही धोरण निश्चित केले नसल्याचे आरोप व्हिएगस यांनी केला.

इंडिया आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आले असून, आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत देखील ही एकजूट अशीच राहील, असेही व्हिएगस म्हणाले.

अशी होणार लोकसभा लढत

उत्तर गोवा - श्रीपाद नाईक (भाजप), रमाकांत खलप (काँग्रेस) आणि मनोज परब (आरजी)

दक्षिण गोवा- पल्लवी धेंपे (भाजप), विरियातो फर्नांडिस (काँग्रेस) आणि रुबर्ट परेरा (आरजी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

SCROLL FOR NEXT