Goa Rape Case Dainik Gomantak
गोवा

गोव्यात संतापाची लाट: शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पंधरा दिवसात बलात्काराची दुसरी घटना, म्‍हापसा पोलिसांनी ठोकल्‍या बेड्या

दैनिक गोमन्तक

म्हापसा: बार्देश तालुक्यातील म्हापसा (Mapusa) पोलिस (Police Station) स्थानकाच्या हद्दीत एका 47 वर्षीय ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाने (Teacher) 7 वर्षीय बालिकेवर लैगिक अत्याचार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या शिक्षकाविरोधात म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री त्याला अटक केली. दरम्‍यान, या प्रकारामुळे म्‍हापशात संतापाची लाट पसरली असून, संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्‍याची मागणी होत आहे.

म्हापसा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या मुलीच्या आईने रात्री पोलिसांत तक्रार दाखल केली. गेल्या चार-पाच दिवसांपासून मुलीचे ट्युशन घेण्यासाठी तो शिक्षक आपल्‍या घरी येत असे. घराच्‍या एका खोलीत तो ट्युशन घेत असे. या प्रकरणी त्या शिक्षकाला काल रात्री तात्काळ अटक करण्‍यात आली.

पंधरा दिवसांतील दुसरी घटना

म्हापसा पोलिस स्थानकाच्‍या हद्दीत घडलेली पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना झालेली आहे. गेल्या आठवड्यात म्हापसा परिसरात राहणाऱ्या वडिलानेच आपल्या १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्‍याचार केल्‍याचे उघड झाले होते. विशेष म्‍हणजे गेल्या चार वर्षांपासून तो हे कृत्‍य करीत होता. त्या मुलीने आपल्या बापाविरोधात म्हापसा पोलिसांत तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या वडिलांना अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT