Goa Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Liquor Seized: कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीची 65.28 लिटर दारू जप्त

अबकारी अधिकार्‍यांची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Liquor Seized गोव्यातून महाराष्ट्रासह लगतच्या कर्नाटक राज्यात अवैधरित्या दारूची वाहतूक केली जाते. अबकारी अधिकार्‍यांच्या सतर्कतेने बऱ्याचदा चेकपोस्टवर अवैधरित्या दारू वाहतूक करणारी वाहने जप्त केली जातात.

नुकतीच अशीच एक घटना घडली आहे. मोले चेकपोस्टवर विनापरवाना दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत पोलिसांनी 65.28 लिटर दारू जप्त केलीय.

त्यातच सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचेवारे वाहू लागले आहेत. मतदार दारू सारख्या प्रलोभनांना बळी पडू नयेत तसेच निवडणूक मुक्त व निष्पक्ष व्हावी यासाठी चेकपोस्टवर सर्व वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश उत्पादन शुल्क आयुक्तांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर हि कारवाई केल्याचे समजतेय.

यासंबंधी प्रभारी उत्पादन शुल्क निरीक्षक रोहित देसाई यांनी माहिती देताना असे म्हटले आहे की, निवडणूक मुक्त व निष्पक्ष व्हावी यासाठी सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून मोले चेकपोस्ट येथे 65.28 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT