Mapusa Fire Department Dainik Gomantak
गोवा

Mapusa: तोल गेला अन् खाली कोसळली; म्हापशात विहिरीत पडलेल्या वृद्धेला जीवदान

Mapusa Fire Department: विहिरीत 30 ते 35 फुटापर्यंत पाणी होते, प्रसंगावधान राखत मोटारीच्या लोखंडी पाईपला पकडून ठेवल्याने ती बचावली.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Fire Department

सीम-खोलीं, म्हापसा येथे विहिरीत पडलेल्या अंदाजे 60 ते 65 वयोगटातील वृद्धेला म्हापसा अग्निशमन दलामुळे जीवदान मिळाले. तोल गेल्याने त्या विहिरीत पडल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना बुधवारी (ता.29) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. यादरम्यान विहिरीशेजारी बसलेली वृद्ध महिला तोल जाऊन विहिरीत पडली. घरात वृद्धा दिसत नसल्याने कुटुंबीयांनी घराबाहेर शोध घेऊन विहिरीत डोकावून पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर म्हापसा अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.

या विहिरीत 30 ते 35 फुटापर्यंत पाणी होते. पीडित वृद्धेने प्रसंगावधान राखत मोटारीच्या लोखंडी पाईपला पकडून ठेवल्याने ती पाण्यात बुडाली नाही. यावेळी दलाचे कर्मचारी सूरज शेटगावकर हे शिडीच्या सहाय्याने विहिरीत उतरले. आणि दलाच्या इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने वृद्धेला बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT