Suchana Seth Dainik Gomantak
गोवा

Suchana Seth Case: 'झोपले तेव्हा कुशीत होता, उठले तेव्हा मरण पावलेला', सूचनाचा जबाब; आरोपपत्र सादर

Suchana Seth Case: पोलिसांनी बारीकसारीक पुराव्‍यांची शृंखला तयार करत ६४० पानी आरोपपत्र काल बाल न्यायालयात सादर केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Suchana Seth Case

आपला चार वर्षांचा मुलगा चिन्मय याचा खून केल्याच्या आरोपावरून सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या सूचना सेठ हिचा कबुली जबाब नसताना पोलिसांना आता परिस्थितीजन्य पुराव्यांवर खटला उभा करावा लागणार आहे.

पोलिस यासाठी ५९ साक्षीदारांची मदत घेणार आहेत. यात टॅक्सीचालकापासून कर्नाटक पोलिसांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. ‘आपण झोपले तेव्हा मुलगा कुशीत झोपला होता, सकाळी उठले तेव्हा तो मरण पावलेला दिसला’ एवढेच तिने आपल्या जबानीत सांगितले आहे.

पोलिसांनी या साऱ्याचा तपास करत खोलीत सापडलेल्या चुरगळलेल्या टिश्यू पेपरपासून बारीकसारीक पुराव्‍यांची शृंखला तयार करत ६४० पानी आरोपपत्र काल बाल न्यायालयात सादर केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांदोळी येथे ज्या खोलीत हा खून झाला असावा असा संशय आहे, तेथे सूचना पोलिस कोठडीत असताना पोलिस तिला घेऊन गेले होते.

तिला मनमोकळेपणाने त्यांनी बोलू दिले. तिने इतर गोष्टी अगदी बॅगमध्ये मृतदेह कसा भरला हे दाखवलेही. मात्र, खून कसा केला व का केला याविषयी तिने चकारशब्दही काढला नाही. तिची मानसिक स्थिती तपासण्यासाठी बांबोळी येथील मानसोपचार केंद्रात तिची तपासणी करण्यात आली होती.

पोलिसांनी तिचा विभक्त पती रमण याला गोव्यात बोलावले. त्याला पोलिस कोठडीत असलेल्या सूचना हिच्याशी समोरासमोर बोलण्याची संधी दिली, तेव्हा ती आपल्या विभक्त नवऱ्याशी भांडली होती व झाल्या प्रकाराला तोच जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयातील ती तज्ज्ञ असल्याने पोलिसांचे प्रश्न कसे टोलवावेत हे तिला ठाऊक झाले होते. देश पातळीवरील माध्यमांची नजर या घटनेकडे लागून राहिली होती. त्यामुळे पोलिसांना जबाब घेण्यासाठी पोलिसी खाक्याचा वापरही करता आला नव्हता.

७ जानेवारी रोजी बंगळूरमधून ती गोव्यात मुलगा चिन्मयसह आली होती. त्याच रात्री टॅक्सीतून बंगळूरला जाताना मुलगा तिच्यासोबत नव्हता. त्याविषयी पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता फातोर्ड्यात एका मित्राकडे मुलगा आहे असा बनाव तिने रचला. मात्र, ती माहिती

खोटी असल्याचे सिद्ध झाल्यावर पोलिसांचा संशय बळावला. हॉटेलच्या खोलीत रक्ताचे डाग सापडल्याने या प्रकरणाला वाचा फुटली होती. बंगळूरजवळ टॅक्सी पोचली असता गोवा पोलिसांच्या सूचनेनुसार टॅक्सीचालकाने जवळच्या पोलिस ठाण्यावर टॅक्सी नेली आणि सूचना हिच्या बॅगेत चिन्मयचा मृतदेह सापडला होता.

पोलिसांकडून ६४० पानी आरोपपत्र सादर

सूचना सेठ हिच्या वडिलांनी बाल न्यायालयात धाव घेत तज्ज्ञ डॉक्टरांकरवी तिची मानसिक तपासणी करावी अशी मागणी केली होती. तिच्या विशिष्ट मानसिक स्थितीमुळे तिला आपण काय करतो आहोत याचे भान राहिले नसावे असे तिच्या वडिलांचे म्हणणे होते.

पोलिसांनी या साऱ्याचा तपास करत खोलीत सापडलेल्या चुरगळलेल्या टिश्यू पेपरपासून बारीकसारीक पुराव्‍यांची शृंखला तयार करत ६४० पानी आरोपपत्र काल बाल न्यायालयात सादर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT