Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: भरधाव KTM ने घेतला वृद्ध महिलेचा जीव; गिरीत रस्ता क्रॉस करताना दिली जोराची धडक

Goa Fatal Accident: पणजीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव केटीएम बाईकने महिलेला जोराची धडक दिली. यात महिला गंभीर जखमी झाली.

Pramod Yadav

गिरी / म्हापसा: भरधाव बाईकच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गिरी – म्हापसा येथून समोर आली आहे. ६४ वर्षीय महिला रस्ता क्रॉस करताना तिला भरधाव केटीएम बाईकने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रजनी भरत धारगळकर (६४) असे या अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रजनी या गिरीत महामार्ग ओलांडून आपल्या घरी सेंट अँथनीवाडा-गिरी येथे जात होत्या. त्यावेळी पणजीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव केटीएम बाईकने महिलेला जोराची धडक दिली. यात महिला गंभीर जखमी झाली.

जखमी महिलेला उपचारासाठी म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरु असताना महिलेचा मृत्यू झाला.

अपघातग्रस्त दुचाकीवर मूळ ओडिशा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. लक्ष्मीधर गदाधर बिस्वाल (वय २३, रा. पणजी, मूळ ओडिशा) असे या तरुणाचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT