Murder At Thivim Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: जावयाच्या मारहाणीत 64 वर्षीय सासऱ्याचा मृत्यू, थिवी येथील घटना

जावई जेवीटन डिसोझाला अटक करण्यात आलीय

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime सध्या गोव्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नुकतीच घरगुती वादातून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

थिवी येथे जावयाच्या मारहाणीत 64 वर्षीय सासऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

डेनिस पौल डायस असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी जावई जेवीटन डिसोझाला (वय 39) अटक करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

यासंबंधी प्राप्त झालेली माहिती अशी कि, आरोपी जोनिटोन डिसूझा हा आपल्या कुटुंबासह थिवी येथे त्याच्या सासरी राहत होता. त्याचे आणि त्याच्या सासऱ्यांचे खटके उडत असत.

तसेच जोनिटोन राहत असलेली जागा सोडावी अशी मागणी त्याचे सासरे वारंवार करत असत आणि याच कारणामुळे जोनिटोन याची डेनिस पॉल यांच्याशी बाचाबाची होत असे. जोनिटोन याने डेनिस यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या होत्या.

दरम्यान 3 जून रोजी जोनिटोन याने डेनिस पॉल डायस यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला. या केलेल्या मारहाणीत डेनिस यांचा मृत्यू झाला.

या संदर्भात आरोपी जोनिटन डिसूझा याला 04 जून रोजी अटक करण्यात आली असून सध्या 04 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुढील तपास एसपी निधी व्हॅल्सन यांच्या देखरेखीखाली कोलवाळ पोलीस स्टेशनद्वारे पीआय सोमनाथ महाजिक, पीएसआय कुणाल नाईक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT