Sunburn Festival Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Goa 2023: सनबर्नच्या 82.50 लाख किंमतीच्या 600 पासची चोरी, आयोजक टीममधील 5 जणांना अटक

सनबर्नच्या 82.50 लाख किंमतीच्या तब्बल 600 पासची चोरी झाल्याचे उघकीस आले आहे

Pramod Yadav

Sunburn Goa 2023: सनबर्न महोत्सवातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सनबर्नच्या 82.50 लाख किंमतीच्या तब्बल 600 पासची चोरी झाल्याचे उघकीस आले असून, आयोजक टीममधूनच ही चोरी झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना अटक केलीय.

शिवम च्यारी, महेश गावस, मंजित गावस, यासिन मुल्ला आणि सिद्धगौडा अन्निनाल असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी सनबर्नचे सह-संयोजक अरविंद कुमार यांनी हणजुण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार अरविंद कुमार यांच्याच टीममध्ये काम करणाऱ्या अटक संशयितांनी 82.50 लाख किंमतीच्या तब्बल 600 पासची चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी संशयितांविरोधात आयपीसीच्या कलम 381 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT