Hankhane- Ibrampur Dainik Gomantak
गोवा

गोवा मुक्त होवून 60 वर्षे झाली; हणखणेतील गावकरी रस्त्याच्या प्रतिक्षेत

मागच्या दोन महिन्यापूर्वी मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर (Rajan Korgaonkar) हे एका खेळाच्या बक्षीस वितरणाला आले होते.

Manish Jadhav

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Union Minister Shripad Naik) यांनी मागच्या पाच वर्षापूर्वी इब्रामपूर (Ibrampur) गाव दत्तक घेवून आदर्श गाव बनवण्याचे स्वप्न ग्रामस्थाना दाखवले होते , त्या स्वप्नातच आजही ग्रामस्थ आहेत. आदर्श ग्राम बघण्यासाठी राज्यातील नागरिक या गावात येतात आणि कोणत्या पद्धतीने आदर्श ग्राम तयार केले तर त्याची पाहणी करतात. मात्र गावात तश्या काहीच मुलभूत गरजा पोचलेल्या घराघरात दिसत नाही.

गोवा मुक्त होवून ६० वर्षे झाली , या साठ वर्षात या गावाला देऊ मांद्रेकर , शंभू भावू बांदेकर , बाबू आजगावकर , राजेंद्र आर्लेकर हे आमदार म्हणून मिळाले .या साठ वर्षात धनगर वाडी हणखणे इब्रामपूर (Hankhane- Ibrampur) गावात त्याना पक्का रस्ता नाही . रस्ता नसल्याने ग्रामस्थाना आजारी वयोवृद्ध नागरिकाना अलीकडे पलीकडे जाण्यासाठी बरीच कसरत करावी लागत होती.

मागच्या दोन महिन्यापूर्वी मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर (Rajan Korgaonkar) हे एका खेळाच्या बक्षीस वितरणाला आले होते , त्यावेळी त्यांनी या धनगर वाड्यावर भेट दिली , लोकांच्या समस्या जाणून घेतल्या . रस्त्याशिवाय होणाऱ्या अडचणी स्थानिकांनी मांडल्या . त्यावेळी राजन कोरगावकर यांनी त्याना कोणतेही आश्वासन दिले नव्हते , त्यांनी ग्रामस्थ युवकासोबत रस्त्यासाठी लागणाऱ्या जमीनमालकाकडे चर्चा केली . जमीन मालकांनी रस्त्यासाठी हिरवा कंदील दाखवला ., स्थानिक युवक नागरिक आणि जमीन मालकाच्या सहकार्याला मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी पाठबळ दिले , युवकांच्या वाढत्या उत्साहातून कच्चा रस्ता त्यातच झाला.

या ठिकाणी रस्त्या नसल्याने पाण्याचे पाट जे धोकादायक स्थितीत होते त्यावरून ओहळ आरपार करावा लागत असे , जीव मुठीत घेवून जावे लागायचे आजारी गरोदर स्त्रियाना पाळण्यातून न्यावे लागायचे , हि स्थिती आहे धनगर वाडी परिसराची.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT