Porvorim Flyover Dainik Gomantak
गोवा

Porvorim Flyover: पर्वरीत दोन वर्षांत 6 पदरी उड्डाणपूल; ‘भाम्बू’ला ठेका

Porvorim Flyover: ३६४.६८ कोटींचा देकार स्वीकृत

दैनिक गोमन्तक

Porvorim Flyover: राष्ट्रीय महामार्ग ६६ वर पर्वरी येथे सहा पदरी उड्डाणपूल बांधण्याचे कंत्राट राजेंद्रसिंह भाम्बू इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीने मिळवले आहे. त्यांनी या कामासाठी ३६४.६८ कोटींची बोली लावली होती. २४ महिन्यांत त्यांना हे काम करावे लागणार आहे.

हॉटेल मॅजेस्टीक ते सांगोल्डा तिठा या ५.५ किमीचा हा मार्ग उड्डाणपूल रुपी असणार आहे. या कामावेळी चोगम रस्त्यावरील सपना गार्डनजवळच्या सरकारी जागेतून बगलमार्ग काढून सांगोल्ड्यापर्यंत वाहतूक वळवली जाईल.

पत्रादेवी ते बांबोळी महामार्ग रुंदीकरणाचा हा उड्डाणपूल एक भाग आहे. त्याला काहींनी आक्षेप घेतल्याने सरकारला हे काम हाती घेता आले नव्हते.

बांधकाम मंत्री काब्राल म्‍हणाले...

१६ कंपन्यांनी या साठी बोली लावली होती. या कंपनीने ३६४.६८ दिलेला देकार स्वीकारण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत हे काम येत असल्याने कामाचे आदेश देण्यासाठी काही सोपस्कार करावे लागतील. ते केल्यावर, कामाचे आदेश दिले जातील.

या कामासाठी अन्य एका कंपनीने ५३४ कोटी रुपयांची मागणा केली होती. या कंपनीच्या बोलीत आणि त्या कंपनीच्या बोलीत तब्बल १७४ कोटी रुपयांचा फरक आहे.

यामुळे सर्वांत कमी बोलीची भाम्बू इन्फ्राची निविदा स्वीकारण्यात आली आहे. हीच कंपनी उड्डाणपुलाच्या जोड रस्त्याचेही काम करणार आहे.

‘दिलीप बिल्डकॉन’ उभारणार २ मनोरे

झुआरी पुलावर दोन मनोरे उभारण्याचे काम दिलीप बिल्डकॉन कंपनीने मिळवले आहे. या मनोऱ्यांवर वर्तुळाकार फिरणारे रेस्टॉरंट उभारण्यात येणार आहे.

या कामासाठी चार कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते. अखेर दिलीप बिल्डकॉनची निविदा स्वीकरण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.

वाहनचालकांना मिळेल दिलासा

पर्वरीहून पणजी प्रवास करणे सध्‍या प्रचंड जिकिरीचे ठरत आहे. त्‍यावर तोडगा काढणे आवश्‍‍यक होते. त्‍यासाठी सहा पदरी उड्डाणपूल बांधण्‍याचे नियोजन करण्‍यात आले. त्‍यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खास निधीही काही महिन्‍यांपूर्वी जाहीर केला.

टप्‍प्‍या टप्‍प्‍याने प्रकल्‍पाला चालना मिळत गेली. नेमलेल्‍या ठेकेदाराला दोन वर्षांत प्रकल्‍प पूर्ण करणे आवश्‍‍यक आहे. हा उड्डाणपूल झाल्‍यानंतर प्रवाशांचे हाल कमी होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT