National Family Health Survey Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सर्वाधिक 59 टक्के पुरुषांकडून मद्याचं सेवन

निरीक्षण राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणातून माहिती उघड; 57 टक्क्यांसह अरुणाचल प्रदेश दुसऱ्या स्थानी

दैनिक गोमन्तक

पणजी : मद्यसेवन करण्यात सुशेगाद गोंयकारच पुढे असल्याचं स्पष्ट झालं आहे. गोव्यात सर्वाधिक 59 टक्के पुरुष मद्याचं सेवन करत असून त्याखालोखाल 57 टक्के अरुणाचल प्रदेशमध्ये आणि 50 टक्के तेलंगाणामध्ये सेवन करत असल्याचं निरीक्षण राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणात नोंदवण्यात आलं आहे.

सर्वात कमी मद्य सेवनाचं प्रमाण लक्षद्वीपमध्ये असून ते केवळ 1 टक्के असल्याचं सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे. राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षण 5 2019-20 मध्ये करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात गोव्यासह देशभरातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. गोव्यातील 21.3 टक्के महिलांनी आतापर्यंत शारीरिक किंवा लैंगिक छळाचा सामना केला आहे.

18 ते 49 वयोगटालीत 10 टक्के महिलांनी नवऱ्याकडून होणारा त्रास सहन केला आहे. इतकंच नाही तर स्वत:च्या मालकीचा मोबाईल फोन वापरण्यामध्येही गोव्यातील महिलाच आघाडीवर आहेत. गोव्यातील तब्बल 91 टक्के महिलांकडे स्वत:चा मोबाईल फोन असून त्यानंतर सिक्कीममध्ये 89 टक्के महिलांकडे स्वत:चा फोन असल्याचं सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT