55th Iffi in Goa Registration Mandatory Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa 2024: सिनेरसिकांची निराशा! एक दिवसाची जीवाची इफ्फी आता बंद; संपूर्ण कालावधीसाठी करावी लागणार नोंदणी

55th Iffi in Goa Registration Mandatory: राज्यात सुरू होणाऱ्या ५५ व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राजधानी पणजीतील मांडवी तीराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात सुरू होणाऱ्या ५५ व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राजधानी पणजीतील मांडवी तीराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. परंतु इफ्फीला जर फक्त एक दिवस भेट देऊन आपल्‍याला तिचा आस्वाद घ्यायचा असेल किंवा चित्रपट पाहायचे असतील तर तसे आता करता येणार नाही. आपल्याला संपूर्ण इफ्फीसाठी नोंदणी करावी लागणार आहे.

आयोजकांनी एक दिवसीय पास देणे आता बंद केले असल्याचे नोंदणी कक्षातील अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक चित्रपट चाहते हे खास करून शनिवार-रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी एकदिवसीय पासची नोंदणी करून चित्रपटांचा आस्वाद घेऊ पाहतात. इफ्फीच्या परिसरात फेरफटका मारून आनंद घेत असत परंतु आता तसे करणे शक्य होणार नाही. आता इफ्फीचा आस्वाद घ्यायचा असेल तर संपूर्ण नोंदणी शुल्क भरून प्रतिनिधी नोंदणी करावी लागणार आहे.

अनेक चित्रपट चाहते एखादा दिवस इफ्फीत सहभागी होण्यासाठी रजा टाकून येत. एकदिवसाचा पास घेऊन इफ्फी परिसरातील विविध स्टॉल्सना भेट देत, आपल्या आवडत्या अभिनेत्यांना भेटण्याची संधी घेत ते एक दोन चित्रपट पहायचे आणि एक दिवस जीवाची इफ्फी करून आपल्या स्वगृही किंवा कामाच्या ठिकाणी परतायचे. मात्र ही एक दिवसाची जीवाची इफ्फी आता बंद झाल्यातच जमा आहे.

बॅटरमॅन' या ऑस्ट्रेलियन चित्रपटाद्वारे ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) पडदा आज उघडणार आहे. मायकल ग्रेसी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट यंदाच्या ‘टेल्युराईड चित्रपट महोत्सवा’त तसेच ‘टोरेंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त प्रदर्शित झाला आहे.

ब्रिटिश पॉप गायक रॉबी विल्यम्स यांच्या जीवनावर आधारलेल्या या चरित्रात्मक चित्रपटात विल्यम्सला चिंपांझीच्या रूपात चित्रित केले आहे. रॉबिन विलियम्स हा ब्रिटिश पॉप सुपरस्टार सर्वकालीन महान मनोरंजनकर्त्यांपैकी एक मानला जातो. त्याचा पॉपस्टार म्हणून उदय, त्याची झंजावती प्रगती, त्यानंतरचे त्याचे नाट्यमय पतन आणि त्याचे विलक्षण पुनरागमन या सत्यकथेवर बॅटरमॅन आधारलेला आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक मायकल ग्रेसीने रॉबी विल्यम्सची गोष्ट रॉबीच्या दृष्टिकोनातून अनोख्या प्रकारे सांगितली आहे. एक विनोदी संगीतिका म्हणून ओळखला जाणारा हा चित्रपट रॉबी विलियम्सच्या स्टारडमची तीन दशके चित्रित करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT