IFFI Goa Poster Launch Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

IFFI Goa Poster Launch: कान्सच्या व्यासपीठावरुन इफ्फीचा प्रचार जगभरात होण्यास मदत होईल.

Pramod Yadav

IFFI Goa Poster Launch

गोव्यात होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पोस्टर फ्रान्स येथे सुरु असलेल्या कान्स चित्रपट महोत्सावत लाँच करण्यात आले आहे. बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव, गायक शान आणि यांच्यासह इतर कलाकारांच्या उपस्थित इफ्फीचे पोस्टर लाँच करण्यात आले.

दरवर्षी गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असतो. यामध्ये भारतासह विविध देशातील चित्रपट पाहण्याची संधी देश-विदेशातील चित्रपट रसिकांना मिळत असते.

गोव्यातील चित्रपट महोत्सवाला पाच महिन्याचा अवधी असताना या महोत्सवाचे पोस्टर कान्स चित्रपट महोत्सवात लाँच करण्यात आले आहे.

यावेळी माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांच्यासह अभिनेते व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कान्सच्या व्यासपीठावरुन इफ्फीचा प्रचार जगभरात होण्यास मदत होईल.

फ्रान्समध्ये 14 मे रोजी कान्स चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली असून, 25 मे पर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे. महोत्सवाला अनेक भारतीय कलाकारांनी हजेरी लावली आहे. यात अभिनेत्री ऐश्वर्या रायसह राजपाल यादव, उर्वशी रौतेला यासह अनेकांनी हजेरी लावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pandit Jawaharlal Nehru: आधुनिक भारताचे शिल्पकार! पंडित नेहरुंची 'ती' अखेरची इच्छा; मृत्युपत्रातील उदात्त भावना वाचून तुमचेही पाणावतील डोळे

Belagavi-Goa Highway Accident: बेळगाव-गोवा महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ओव्हरटेकच्या नादात 2 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर

Digital Movement: फक्त 'विरोध' आहे, 'पर्याय' नाही! डिजिटल विश्वातील उपरोधिक चळवळी का ठरताहेत पोकळ?

VIDEO: 97 रन्सवर विकेट गेली अन्...; वैभव सूर्यवंशीचा संयम सुटला; मैदानातच दिली शिवी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Navelim Madrasa Fraud: नावेलीतील मदरशामध्ये आर्थिक गैरव्यवहार? संस्थापक सदस्याचा मडगाव पोलिसांत गंभीर आरोप; अध्यक्षांविरोधात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT