Sara Ali Khan and Karan Johar at 54th IFFI In-Conversation Dainik Gomantak
गोवा

54th IFFI In-Conversation: सिनेमा हा सिनेमा असतो त्याला कशाचे बंधन नसते- करण जोहर

आगामी सिनेमा 'ए वतन मेरे वतन' या आगामी सिनेमाबद्दल चर्चा

दैनिक गोमन्तक

Sara Ali Khan and Karan Johar at 54th IFFI In-Conversation

जयश्री देसाई

सिनेमा कोणत्याही मर्यादांच्या पलीकडे असतो. त्याला सिनेमागृहे, ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे बंधन नसते. तो त्याच्या दर्शकांपर्यंत कोणत्याही माध्यमातून पोहोचत असतो असे निर्माता, दिग्दर्शक करण जोहर यांनी सांगितले. भारतीय आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (IFFI) आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी चित्रपट, सध्याची पिढी तसेच महिलाकेंद्रित सिनेमावर आपली मते व्यक्त केली. 'मी कोणताही चित्रपट करत असताना सिनेमा महिलाकेंद्रित आहे की पुरुषकेंद्रीत हे पाहत नाही. मी सिनेमाच्या कथेचे वर्णन आणि कथेचा आत्मा बघतो. याबरोबरच माझ्या आईने एकटीने मला वाढवले असल्यामुळे माझी भूमिका नेहमीच स्त्रीवादी असते.

मला नेहमी वाटते की, महिलांकडे खूप जास्त शक्ती असते. त्यांनी व्यक्त झाले पाहिजे, जगासमोर आले पाहिजे, त्यामुळे मला जेव्हा जेव्हा संधी मिळते मी त्यांच्यासाठी काहीतरी करत असतो.'

सध्याची पिढी अर्थात जेन झी (जनरेशन झी) बद्दल बोलताना ते म्हणाले, 'आताची मुले खूप हुशार आहेत. ते भरपूर वाचन करतात, ते उत्तम रसिक आहेत. त्यांना प्रत्येक क्षेत्रातील माहिती असते. त्यांना आपल्याला आयुष्यात काय हवे आहे हे माहित आहे. त्यांना आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे, लढणे माहित आहे. इतिहास, राजकारण याची ते माहिती ठेवतात म्हणूनच ही पिढी खूप समंजस आहे.'

अनेकजण या पिढीला प्रेमाचे महत्त्व कळत नाही असे म्हणतात पण ते जेव्हा प्रेम करतात तेव्हा सर्वस्व झोकून देतात, असे ते यावेळी म्हणाले. दरम्यान आपल्या कॉफी विथ करण काऊचवर इच्छिलेल्या गोष्टी सत्यात उतरतात, असे म्हणत त्यांनी प्रेक्षकांना हसवले.

यावेळी उपस्थित अभिनेत्री सारा अली खान हिने बोलताना, 'मला सर्व प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत.' असे सांगितले. मला असे काम करायचे आहे ज्यातून लोक प्रेरणा घेऊ शकतील आणि त्यासाठी सर्व प्रकारची मेहनत घेण्याची माझी तयारी आहे असेही तिने सांगितले.

आगामी सिनेमा 'ए वतन मेरे वतन' या आगामी सिनेमाबद्दल ते बोलत होते. छोडो भारत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरील हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सारा अली खान हिने उषा बेन मेहता यांच्यापासून प्रेरित व्यक्तिमत्त्वाची भूमिका केली आहे, अशी माहिती यावेळी दिली गेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT