54th IFFI Goa Dainik Gomantak
गोवा

54th IFFI Goa: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मायकल डग्लस यांना बहुमानाचा 'सत्यजित रे जीवनगौरव' पुरस्कार...

इफ्फीसाठी 3000 हून अधिक चित्रपटांच्या प्रवेशिका

Kavya Powar

54th IFFI Goa: यंदाच्या इफ्फीची तयारी आता पूर्ण झाली असून आपले राज्य 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सज्ज झाले आहे.

इफ्फीसाठी 3000 हून अधिक चित्रपटांच्या प्रवेशिका दाखल झाल्या असून महोत्सवात 103 आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवले जाणार आहेत.

तसेच महोत्सवात सहभागी झालेले जगातील इतर सर्व चित्रपट यंदाच्या इफ्फी महोत्सवाच्या कॅलिडस्कोपमध्ये दाखवले जातील, अशी माहिती एनएफडीसीचे एमडी प्रुथुल कुमार यांनी दिलीय. सदर माहिती आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

मायकल डग्लसयांना सत्यजित रे पुरस्कार.. 

तसेच अमेरिकन स्टार आणि प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मायकेल डग्लस यांना बहुमानाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

डग्लस हे 27 ते 29 या कालावधीत गोव्यात असून त्यांना कला अकादमी येथे 28 नोव्हेंबर रोजी त्याला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

इफ्फीसाठी पार्किंग व्यवस्था

इफ्फीचा उद्‍घाटन व समारोप सोहळा डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी प्रसाद स्टेडिअमवर होणार असल्याने स्टेडिअमच्या बाहेरील परिसरात चारचाकी तर तेथील मोकळ्या जागेत दुचाकींची सोय करण्यात आली आहे. या दोन्ही सोहळ्यानंतर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आवश्‍यक तयारी करण्यात आली आहे. इफ्फी कार्यक्रमाच्या विविध ठिकाणीही पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी वाहतुक पोलिस तैनात असणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT