Goa Daily News Wrap: गोव्यात पर्यटकांची लूट सुरूच; नीलेश काब्राल यांच्यावर राजीनाम्याची वेळ! राज्यातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

Goa Breaking News: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या शहरातील ब्रेकिंग न्यूज
Goa Live Updates 18 November 2023
Goa Live Updates 18 November 2023Dainik Gomantak

म्हापशात मारहाण; संशयितास अटक

शुल्लक बाचाबाचीवरून म्हापशातील अनिल रामा गुणपत्रे (५६) यांना जबर मारहाण केलेल्या संशयितास म्हापसा पोलिसांनी अटक केली. हिमांशू पटवाल (३३, उत्तराखंड) असे त्याचे नाव असून पोलिसांनी संशयितावर भादंसच्या कलम ३०७ अंतर्गत गुन्हा नोंद केलाय.

कुचबिहार करंडकमध्ये फॉलोऑननंतर गोव्याची घसरण!

सलामीचा फलंदाज वीर यादव याच्या शैलीदार ७३ धावांनंतरही गोव्यावर फॉलोऑनची नामुष्की आली, नंतर दुसऱ्या डावात ४ विकेट ११० धावांत गमावल्यामुळे कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याचा संघ पराभवाचा छायेत आला. मुंबईचा संघ अजूनही ९२ धावांनी पुढे असून त्यांना डावाने विजयाची संधी आहे.

पर्यटकांची लूट सुरूच! महाराष्ट्रातील पर्यटकाला लुबडल्याप्रकरणी एकाला अटक

 राज्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची होणारी लूट अद्यापही सुरूच आहे. कळंगुट येथील मेहफील क्लबमध्ये कोल्हापूरच्या एका पर्यटकाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी योगेंद्र बेहरा (23, ओडिसा) याला अटक केली आहे.

सर्वण येथे घराला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

पेटता सरंगा पडून घराला आग. न्यू वाडा-सर्वण येथील घटना. स्थानिक आणि अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात. मोठी दुर्घटना टळली.

कळंगुट येथील मेहफील क्लबमध्ये कोल्हापूरच्या एका पर्यटकाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी योगेंद्र बेहरा (23, ओडिसा) याला अटक केली आहे.

No Step Down! काब्राल समर्थकांकडून सोशल मीडिया मोहीम!

भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राजीनामा देण्याचा आदेश दिल्यानंतर मंत्री निलेश काब्रालांच्या समर्थकांकडून No Step Down मोहीम सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

महाराष्ट्रातील कुटुंबाचा मोरजी-चोपडे येथे अपघात

दिवाळीच्या सुट्टीत गोव्यात आलेले महाराष्ट्रातील कुटुंब परिवार परत जात असताना मोरजी-चोपडे येथे अपघात. एकूण 6 जणांना दुखापत. अपघातात जीवितहानी नाही मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान. यामध्ये दोन लहान मुले आणि 4 मोठ्या व्यक्तींचा समावेश.

मंत्रीमंडळ फेररचना, मुख्यमंत्र्यांकडून शक्यतेला दुजोरा!

प्रश्न- निलेश काब्रालांना काढून आलेक्स सिक्वेरांना मंत्री देणार का?

मुख्यमंत्र्यांच उत्तर- जेव्हा निर्णय होऊल तेव्हा तुम्हाला कळवू.

मंत्रीमंडळ फेररचनेच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांकडून दुजोरा.

पाशेको दांपत्य उतरणार निवडणूक रिंगणात!

मिकी पाशेको पुढील विधानसभा निवडणूक बाणावलीतून तर त्यांची पत्नी व्हिएला पाशेको नुवे मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार. मिकी पाशेकोंनी पत्रकार परिशदेत दिली माहिती.

ज्‍येष्‍ठ पत्रकार प्रमोद प्रभुगावकर यांना चंद्रकांत केणी पत्रकारिता पुरस्‍कार

मागची ४८ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले ज्‍येष्‍ठ पत्रकार प्रमोद प्रभुगावकर यांना यंदाचा स्‍व. चंद्रकांत केणी यांच्‍या नावे दिला जाणारा पत्रकारिता पुरस्‍कार जाहीर करण्‍यात आला असून २६ नोव्‍हेंबर रोजी स्‍व. केणी यांच्‍या जयंतीनिमित्त मडगावात आयाेजीत केल्‍या जाणार्‍या एका जाहीर समारंभात त्‍यांना हा पुरस्‍कार देण्‍यात येणार आहे.

मडगाव रेल्वे स्थानकावर वाहनांसाठी शुल्क

'इफ्फी'त असे असेल चित्रपटांचे वर्गीकरण...

यंदा 'इफ्फी'त 3000 हून अधिक चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. यातून ठराविक सिनेमांची निवड करण्यात आली आहे. 103 आंतरराष्ट्रीय चित्रपटांसह जगभरातील चित्रपट दाखवले जाणार आहेत. इतर जागतिक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात सहभागी झालेले सर्व चित्रपट यंदाच्या इफ्फी महोत्सवाच्या कॅलिडस्कोपमध्ये दाखवले जातील अशी माहिती एनएफडीसीचे एमडी प्रुथुल कुमार यांनी दिली.

मायकल डग्लसयांना सत्यजित रे पुरस्कार.. 

अमेरिकन स्टार आणि प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मायकेल डग्लस 27 ते 29 या कालावधीत गोव्यात असून त्याला कला अकादमी येथे 28 नोव्हेंबर रोजी त्याला सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

गोव्याच्या मुली फक्त 8 धावांत गारद

बीसीसीआय 15 वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत शनिवारी गोव्याचा डाव 9.2 षटकांत अवघ्या 8 धावांत गारद झाला. हरियानातील लाहली येथे झालेल्या लढतीत बंगालने 266 धावांनी मोठा विजय नोंदविला. गोव्याची ही सर्वांत नीचांकी धावसंख्या आहे.

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने म्हापसा-शिवोली रस्त्यावर वाहतूक कोंडी

शिवोली-म्हापसा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याची घटना घडली असून बंगळूर वरून ग्रेनाईट घेऊन येणाऱ्या एका ट्रक ट्रॉलीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्ता सोडून लगतच्या झाडीमध्ये घुसला हा ट्रक पुन्हा मार्गावर आणण्यासाठी दुसऱ्या ट्रकचा वापर करावा लागणार असल्याचे ट्रॉली चालकाचे म्हणणे आहे.

अग्निशमन दल 'हायटेक' बनणार! 'या' अत्याधुनिक यंत्रणांची संचालकांनी दिली माहिती

गोवा राज्य अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये आगी लागण्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन यंत्रणा असून लवकरच रिमोट सेन्सिंग फायर फायटिंग ही अत्याधुनिक यंत्रणा ग्निशमनकडे दाखल होणार आहे. यामुळे अग्निशमन दल जलदगतीने काम करू शकणार आहेत.

या अत्याधुनिक मशिनरीमुळे जळत्या इमारतीत पाण्याचा मारा करण्यासाठी पाइप वाहून नेण्यासाठी अग्निशामकाची आवश्यकता भासणार नाही. तसेच ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दल आगीपासून सुरक्षितस्थळी जाऊन दुरून ही मशिनरी चालवू शकतात.

व्हाळशी रस्त्यावर विभाजक बसविणार; अपघात टाळण्यासाठी आमदारांचा पुढाकार

डिचोलीच्या अपघातप्रवण व्हाळशी रस्त्यावर विभाजक बसविण्यात येणार असल्याची माहिती समोर येतेय. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी या रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि नगरसेवक उपस्थितीत होते.

न्यू वाडे येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट; सासू-सुनेचा जागीच दुर्दैवी मृत्यू

काही दिवसांपूर्वी कारेमड्डी कुडचडे येथील जामा मशिदजवळील एका घरात सिलिंडरचा स्फोट होऊन किचन पूर्णपणे जळाल्याची घटना ताजी असताना अशाच प्रकारची दुसरी घटना वास्को येथे घडलीय.

शनिवारी सकाळी वास्को येथील न्यू वाडे येथे सिलिंडर लिकेज झाल्यामुळे स्फोट झाला असून या घटनेत शिवानी राजावत (26) आणि त्यांच्या सासू जयदेवी यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येतेय. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या शिवानी ह्या गर्भवती असल्याचीही माहिती मिळतेय.

पुन्हा कृष्णकृत्य ! बनावट अकाउंटद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान

दोन धर्मात धार्मिक तेढ निर्मण करून राज्यातील शांतता भंग करण्याचे प्रकार याआधी बरेच वेळा घडले असून आता पुन्हाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे फोटो शेअर करण्याचे कृत्य कुडचडे येथे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com