Goa Electricity Department Pending Dues 
गोवा

पेडणे, बार्देशमधील वीज ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, ...अन्यथा वीज कनेक्शन तोडले जाणार

Goa Electricity Department Pending Dues: म्हापसातील सहा आणि सात या दोन्ही विभागातील ग्राहकांना वीज खात्याने नोटीस बजावली आहे.

Pramod Yadav

Goa Electricity Department Pending Dues

गोवा वीज खात्याने बार्देश आणि पेडणे तालुक्यातील वीज ग्राहकांसाठी महत्वाची सूचना प्रसिद्ध केली आहे. वीजबिल थकबाकी असणाऱ्या ग्राहकांनी त्वरीत थकबाकी न भरल्यास पूर्व सूचना न देता त्यांची वीज जोडणी तोडली जाईल, असे खात्याने म्हटले आहे.

म्हापसातील सहा आणि सात या दोन्ही विभागातील ग्राहकांना वीज खात्याने नोटीस बजावली आहे.

दोन्ही तालुक्यातील सुमारे पाच हजार ग्राहकांची वीजबिल थकबाकी असून, यात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांचा समावेश आहे. दहा कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे वीज खात्याने म्हटले आहे.

थकबाकी न भरल्यास पूर्व सूचना न देता ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येईल असे कळविण्यात आले आहे.

या गावातील ग्राहकांना सूचना

म्हापसा वीज खात्याच्या कार्यालयाने बार्देश तालुक्यातील थिवी, शिरसई, हणजूणे, आसगाव, शिवोली, सोडये, कामुर्ली, नास्नोडा, मयडे, कोलवाळ आणि संपूर्ण पेडणे तालुका, कळंगुट, कांदोळी, नेरुल, रेईस मागोस, सळगाव, सुकुर, पर्वरी, पेन्हा द फ्रांका, साल्वादोर द मुंद, पिळर्ण, गिरी, हडफडे -नागोवा, वेर्ला-काणका, बस्तोडा, उकसई, पोंबुर्फा- एकोशी, ओळावली, हळदोणा, कारोणा, कालवी, किटला, खोर्जुवे, म्हापसा नगरपालिका भागातील वीज ग्राहकांनी आपली बिलांची थकबाकी असल्यास ती त्वरीत भरावी अशी सूचना करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT