BE Admissions Canva
गोवा

BE Admission: ..अजूनही जागा रिक्तच! इंजिनियरिंग प्रवेशासाठी 'तिसऱी फेरी' १५ सप्टेंबरपासून

Goa Engineering Admission: दोन फेऱ्या आटोपल्यानंतरही ५०० जागा रिक्त असून या जागांच्या प्रवेशासाठी तिसऱ्या फेरीला १५ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सरकारने जेईई निकषात शिथिलता करूनही इंजिनियरिंगच्या प्रवेशाच्या दोन फेऱ्या आटोपल्यानंतरही ५०० जागा रिक्त असून या जागांच्या प्रवेशासाठी तिसऱ्या फेरीला १५ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे.

सुमारे २० वर्षांनंतर इंजिनियरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. गोवा कॉमन एन्ट्रन्स टेस्टच्या ऐवजी जईईच्या आधारावर प्रवेश देण्यात आला. परंतु इंजिनियरिंग प्रवेशाला अल्प प्रतिसाद लाभल्याने जेईई (JEE) पात्रता निकष शिथिल करत जे विद्यार्थ्यी विज्ञान शाखेतून किमान ४५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत त्यांना प्रवेश द्यावा असा प्रस्ताव तंत्रविज्ञान संचालनालयाने मंजुर केला तरीही अल्प प्रतिसाद लाभत आहे.

दरम्यान, १४ सप्टेंबरपासून प्रवेशासाठीच्या तिसऱ्या फेरीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी जेईई उत्तीर्ण झालेले नाहीत परंतु जे बी.ई अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी ईच्छुक आहेत त्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, गणित, आणि रसायनशास्त्रात ४५ टक्क्याहून अधिक गुण घेत बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

पाच महाविद्यालये,१५०० जागा

राज्यात पाच महाविद्यालयांमध्ये सुमारे बी.ईच्या एकूण १५०० जागा आहेत. यापैकी एक सरकारी गोवा इंजिनियरिंग महाविद्यालय, आणि खासगी - पेद्रे कॉन्सीसीयाव कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, वेर्णा, डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनियरिंग फातोर्डा, रायेश्‍वर इन्‍स्टीट्यूट ऑफ इंजिनियरिंग इनफॉरमेशन टॅक्नोलॉजी शिरोडा, आणि आग्नेल इन्स्टीट्यूट ऑफ टॅक्नोलॉजी ॲण्ड डिझायन, आसगाव. इंजिनियरिंग अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले विद्यार्थी बहुतांशी इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्युपटर इंजिनियरिंग अभ्यासक्रमाला अधिक प्राधान्य देत आहेत. याउलट नीट परीक्षा उत्तीर्ण मेडिकल, फार्मा, डेंटल आणि नर्सिंगच्या अभ्यासक्रमासाठी ७५० जागा उपलब्ध होत्या त्या पूर्ण भरल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT