Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: ड्रग्ज तस्करप्रकरणी 5 पोलिसांचे आरोप निश्‍चितीला आव्हान

ड्रग्ज तस्करप्रकऱणी इस्रायली डेव्हिड डिहॅम ऊर्फ डुडू याला न्यायालयाने निर्दोष मुक्त करून ही कारवाई करणाऱ्या सात पोलिसांविरुद्ध आरोप निश्‍चितीचा आदेश दिला होता.

दैनिक गोमन्तक

Goa Drug Case: ड्रग्ज तस्करप्रकऱणी इस्रायली डेव्हिड डिहॅम ऊर्फ डुडू याला न्यायालयाने निर्दोष मुक्त करून ही कारवाई करणाऱ्या सात पोलिसांविरुद्ध आरोप निश्‍चितीचा आदेश दिला होता. या आदेशाला पाच पोलिसांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावर उद्या ४ सप्टेंबरला सुनावणी ठेवण्यात आली आहे.

अमलीपदार्थविरोधी पथकाच्या पोलिसांनी २०१० साली मध्यरात्रीच्या सुमारास हणजूण येथील सेंट अँथनी चॅपेलजवळ छापा टाकून डुडू याला ड्रग्जसह अटक केली होती. पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. मात्र, या प्रकरणात राजकारणी व पोलिस गुंतले असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी एका काँग्रेस नेत्याने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी सीबीआयने पुढील तपास केला होता.

अंमलीपदार्थविरोधी कक्षाने संशयित डुडू विरुद्ध आरोपपत्र सादर केले होते. त्यात न्यायालयाने आरोप निश्‍चित करण्याचा आदेश दिला होता. या तपासावेळी डुडूने गोवा पोलिसांनी नोंदवलेला गुन्ह खोटा असल्याचा दावा केला होता.

न्यायालयाने पुरवणी आरोपपत्रावरील सुनावणीवेळी या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात आरोप निश्‍चित करण्याचा आदेश दिला होता. आरोप निश्‍चितीच्या दिवशी पोलिसांनी त्याला आव्हान देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागून घेतली होती. त्यामुळे या आदेशाला उच्च न्यायालयाने उद्या स्थगिती न दिल्यास त्यांच्याविरुद्ध आरोप निश्‍चितीबाबतची सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.

सात जणांविरूद्ध पुरवणी आरोपपत्र

सीबीआयने याप्रकरणी केलेल्या तपासात जिथे त्याच्यावर कारवाई झाली तेव्हा, तेव्हा तो तेथे नव्हता हे कारवाईत असलेल्या पोलिसांच्या कॉल रेकॉर्डवरून उघड झाले होते. त्यामुळे सीबीआयने या छाप्यात सहभागी तत्कालीन पोलिस उपअधीक्षक नरेश म्हामल, पोलिस उपनिरीक्षक सुनील गुडलर यांच्यासह इर्मिया गुरैया, समीर वारखंडकर, महादेव नाईक, नागेश पार्सेकर, महाबळेश्वर सावंत या सात पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात षडयंत्र रचणे, बनावट गुन्हे दाखल करणे, न्यायालयाची दिशाभूल करणे या आरोपांसह पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT