Goa Assembly |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session : विधानसभेचे 5 दिवसीय अधिवेशन; 27 मार्चपासून सुरू

राज्यपालांकडून अधिसूचना जारी

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Budget Session : आठव्या विधानसभेचे चौथे अधिवेशन 27 ते 31 मार्च दरम्यान होत असल्याची अधिसूचना आज राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यांनी काढली असल्याची माहिती विधानसभा सचिव नम्रता उलमन यांनी दिली.

सचिव उलमन यांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेचे अधिवेशन 27 ते 31 मार्च पर्यंत चालेल. 31 मार्च हा खाजगी सदस्य दिवस असेल. या दिवशी विधानसभा सदस्य आपले खाजगी ठराव सूचना मांडू शकतात. तर अन्य दिवशी नियमित प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, शून्य प्रहर आणि चर्चा होईल.

खाजगी सदस्य दिवसासाठी 16 मार्चपूर्वी आमदारांनी आपले ठराव, विधेयक सादर करावेत असे म्हटले आहे. 27 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या दक्षता, सामान्य प्रशासन, विमानतळ, शिक्षण, माहिती आणि प्रसिद्धी, वजन मापे, कौशल्य विकास या खात्यांसंबंधीचे प्रश्न चर्चेला येतील.

याच दिवशी वीजमंत्री रामकृष्ण ढवळीकर आणि समाज कल्याण मंत्री सुभाष फळ देसाई यांच्याकडील खात्याचे प्रश्न चर्चेला घेतले जातील. 28 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांसह जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याकडे असलेल्या खात्यांवरील प्रश्न चर्चेला येतील.

तर 29 मार्च रोजी नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे, क्रीडामंत्री गोविंद गावडे, परिवहन मंत्री मावीन गुदिन्हो यांच्या खात्यांचे प्रश्न चर्चेला येणार आहेत.

तर शेवटच्या दिवशी 30 मार्च रोजी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल, कृषिमंत्री रवी नाईक, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडे असलेल्या खात्यांशी संबंधित प्रश्न चर्चेला येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT