उल्हास तुयेकर Dainik Gomantak
गोवा

Goa Water Supply : जलपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी 5 कोटींची तरतूद - उल्हास तुयेकर

नावेलीत आठ कोटींची कामे पूर्ण

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : मागच्या वर्षभरात नावेली मतदारसंघात 18 कोटींची कामे मार्गी लागली असून त्यापैकी 8 कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. इतर कामाच्या निविदा जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली.

तळावली - वार्का पुलाच्या दुरुस्तीसह मतदारसंघातील रस्त्यांचे रुंदीकरण, नाल्यांची आणि गटारांची बांधणी, रस्त्यांचे डांबरीकरण आणि नवीन जलवाहिन्या टाकणे अशी एकूण 29 कामे सध्या हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. नावेली मतदारसंघातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी 5.30 कोटी रुपये खर्चून नवीन जलवाहिन्या बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच रावणफोंड जंक्शन ते रावोलापर्यंत जलवाहिनी बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

आतापर्यंत झालेली कामे

आतापर्यंत जी कामे पूर्ण झाली आहेत त्यात रावणफोंड येथील नाला, मांडप येथील गटार दुरुस्ती, रुमडामळ येथील रस्ता रुंदीकरण, आणि झरीवाडा येथील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती या कामांचा समावेश आहे, अशी माहिती आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली.

पुढीप टप्प्यात होणारी कामे

रावणफोंड येथे साकव बांधण्यासह बेले येथे रस्ता, दवर्ली - चांदर रस्त्यावर दिवा बत्तीची सोय, तसेच मांडप येथील नाल्याची कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. नावेली मतदारसंघांत कित्येक रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण सुरू असल्याचे आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT