Varca Murder Case Dainik Gomantak
गोवा

48 तास उलटले तरी वार्का खुनाचा पोलिसांकडून सोक्षमोक्ष नाही

पोलिसांचा मुलीवर संशय, मात्र अजून पक्के पुरावे हाती लागेनात

दैनिक गोमन्तक

Varca Murder Case: वार्का येथे घरी एकटाच राहणाऱ्या त्रिनिदाद मार्टिन्स या 80 वर्षीय वृद्धाचा खून होऊन 48 तास उलटले तरी कोलवा पोलीस अजून खुन्या पर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. या खुना प्रकरणी पोलिसांनी मयताच्या मुलींवरच सुरवातीला संशय घेतला असला तरी अजून पोलिसांच्या (Police) हाती ठोस पुरावे लागू शकलेले नाहीत.

वार्का (Varca) येथील मयत मार्टिन्स याला एकच मुलगी असून तिचे आपल्या बापाशी पटत नसल्याने ती वेगळी राहते. मार्टिन्स आणि तिचा घराच्या मालकीवरून वाद होता. मार्टिन्स आपले घर मुलीला न देता कुठल्या तरी संस्थेला दान करण्याच्या तयारीत होता अशी माहिती मिळाली असून काही दिवसांपूर्वी काही व्यक्ती त्यांच्या घराकडे येऊन जमिनीची मोजणी करूनही गेले होते.

संशयावरून आम्ही मयताच्या मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली असली तरी अजून आमच्या हाती काहीच ठोस माहिती आलेली नाही अशी माहिती तपास अधिकारी असलेले निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिली.

गुरुवारी रात्री आठच्या सुमारास या वृद्धाच्या डोक्यावर लोखंडी दांड्याने प्रहार करून त्याचा खून केला होता. मयताच्या तोंडावरही आणखी जखमा सापडल्या होत्या. ज्या ठिकाणी हा खून झाला ते मार्टिन्स यांचे घर दाट लोकवस्तीत असून हा खून करून खुनी सहीसलामत कसा निघून गेला याबद्दल शेजारी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

ज्या रात्री हा खून झाला त्यापूर्वी संध्याकाळी मार्टिन्स याना त्यांच्या शेजाऱ्यांनी व्हारांड्यावर पाहिले होते. त्यानंतर काही वेळानंतर त्यांच्या घरातून वादावादी चालू असल्याचा आवाज येत होता. पण नंतर काय झाले ते मात्र कुणी काही सांगू शकत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

Goa Cyber Fraud Cases: गोव्यात सायबर फसवणुकीचे वाढते जाळे; ऑनलाईन व्यवहारांत नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा, पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

Bharatiya Nyaya Sanhita Cases: सुमारे 78% प्रकरणांत आरोपपत्रे दाखल; 'बीएनएस' अंतर्गत गेल्‍या दोन वर्षांत 4,459 गुन्‍ह्यांची नोंद

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT