Electrocution Death  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ... अन् काही कळण्याच्या आतच त्याला मृत्यूनं गाठलं; गोव्यात नेमकं काय घडलं?

Goa Crime: राज्यात मासेमारीला 1 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. यासाठी मासेमारी करणारे ट्रॉलर्स आणि बोटी देखील समुद्रात जाण्यास सज्ज आहेत.

Manish Jadhav

राज्यात मासेमारीला 1 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. यासाठी मासेमारी करणारे ट्रॉलर्स आणि बोटी देखील समुद्रात जाण्यास सज्ज आहेत. याचदरम्यान समुद्रकिनाऱ्यावर तयारी करत असताना एका मासेमारी करणाऱ्या बांधवाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, जाळी ओढत असताना अचानक त्याच्या ह्रदयात वेदना होऊ लागल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर तात्काळ त्याला उपस्थित सहकाऱ्यांनी दवाखान्यात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मूळचा आंध्रप्रदेशचा रहिवासी असलेल्या या व्यक्तीचे नाव कोमारा याराना असे आहे. कोस्टल पोलिस पुढील तपास करतायेत.

दरम्यान, आज सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास हवामान आणि सुमद्राचा अंदाज न घेताच समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट किनाऱ्यापासून काही अंतरावर उलटली. बोटीमधील मच्छिमार बांधवांनी आरडाआरोड करताच किनाऱ्यारील जीवरक्षक आणि पर्यटक पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करुन समुद्रात बुडणाऱ्या 13 मच्छिमारांसह बोटही किनारी आणली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीत मच्छिमार आणि मदतनीस मिळून 13 जण होते. हे सर्वजण मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये गेले होते. मात्र आता त्यांना रेस्क्यू करण्यात आले आहे. बचावकार्यादरम्यान, एक जीवरक्षक साहिल तुळसकर यांना दुखापत झाली. तुळसकर यांना तात्काळ उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसरीकडे, या 13 जणांपैकी एकाला किरकोळ दुखापत वगळता कोणत्याही मच्छिमार बांधवाला दुखापत झालेली नाहीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT