Goa Food Adulteration Cases Dainik Gomantak
गोवा

Goa Food Adulteration Cases: पाच वर्षांत राज्‍यात अन्न भेसळीची 43 प्रकरणे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती

Food Adulteration Cases: राज्‍यात गेल्‍या पाच वर्षांत अन्न भेसळीसंदर्भातील ४३ प्रकरणे उघडकीस आली असून, आरोग्‍य खात्‍यामार्फत या प्रकरणात गुंतलेल्‍यांना दंडही ठोठावण्‍यात आला

Sameer Amunekar

पणजी : राज्‍यात गेल्‍या पाच वर्षांत अन्न भेसळीसंदर्भातील ४३ प्रकरणे उघडकीस आली असून, आरोग्‍य खात्‍यामार्फत या प्रकरणात गुंतलेल्‍यांना दंडही ठोठावण्‍यात आला असल्‍याची माहिती केंद्रीय आरोग्‍य राज्‍यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून दिली आहे.

२०२०–२१ ते २०२४–२५ या पाच वर्षांच्‍या काळात राज्‍य आरोग्‍य खात्‍याने अन्न भेसळीसंदर्भातील २,९९९ प्रकरणांतील नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्‍यातील ४३ प्रकरणांतील नमुन्‍यांमध्‍ये भेसळ झाल्‍याचे सिद्ध झाल्‍याने संबंधितांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली, असे जाधव यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

राज्‍यातील अन्न भेसळीची प्रकरणे

वर्ष नमुने घेतले भेसळ आढळली

२०२०–२१ ३२९ २

२०२१–२२ २०० २

२०२२–२३ ६९९ ११

२०२३–२४ ५९९ १७

२०२४–२५ १,१७२ ११

एकूण २,९९९ ४३

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; भाजपचे माजी आमदार 'आप'च्या संपर्कात?

Goa Cabinet Expansion: रमेश तवडकर आणि दिगंबर कामत 'शपथबद्ध'! वर्षभर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पूर्ण

Mumbai Cricket: मुंबई क्रिकेटमध्ये खळबळ! कर्णधारपदाचा राजीनामा दिला, खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिला धक्का

Digambar Kamat: सातवेळा मडगावातून विजयी, 2007 ते 2012 काळात मुख्यमंत्रिपदी; दिगंबर कामत यांची चढ-उताराची वाटचाल

Mandovi River Cruise Sink: किनाऱ्यावर नांगरलेल्या बोटीत शिरलं पाणी, मांडवी नदीत 'क्रूझ' बुडाली; राज्यात पावसाचं थैमान

SCROLL FOR NEXT