Wilbert Egyptian Dainik Gomantak
गोवा

Calangute News: प्रतिकूलतेवर मात करत विल्बर्ट बनला ‘आयर्नमॅन’

जिगरबाज : फिलिपिन्समध्ये जोरदार पाऊस, खवळलेल्या समुद्रातही केली लक्ष्यपूर्ती

गोमन्तक डिजिटल टीम

Calangute News प्रतिकूल हवामानाची तमा न बाळगता कळंगुट येथील ४२ वर्षीय विल्बर्ट इजिप्सी याने फिलिपिन्समधील खडतर आयर्नमॅन शर्यत यशस्वीपणे पूर्ण केली. स्युबिक बे येथे झालेल्या स्पर्धेत त्याने खुल्या समुद्रातील जलतरण, सायकलिंग व पूर्ण मॅरेथॉन मिळून एकूण २२६ किलोमीटर अंतर १५ तास ४४ मिनिटांत पूर्ण केले. ही शर्यत १७ तासांत पूर्ण करणे आवश्यक होते.

विल्बर्ट मूळचा वेळसांव येथील; पण सध्या कळंगुटला राहतो. तंत्रज्ञानविषयक सल्लागार आहे. त्याच्यासाठी फिलिपिन्समधील शर्यत कसोटी पाहणारी ठरली. पावसाचा तडाखा सोसत त्याने गेल्या रविवारी (ता. ११) लक्ष्यपूर्ती साधली.

फिलिपिन्समधील शर्यतीविषयी विल्बर्टने सांगितले की, ‘पूर्ण शर्यतीच्या कालावधीत जोरदार पाऊस अन् समुद्रही खवळलेला होता आणि मलब्यामुळे जलतरण कठीण ठरले. दहा ट्रायथलीट्सना शर्यत प्रारंभीच सोडावी लागली.’

ट्रायथलीट विल्बर्टचा आतापर्यंतचा अनुभव

1. कोलंबो आणि गोव्यात ७०.३ आयर्नमॅन शर्यत यशस्वीपणे पूर्ण.

2. नऊ पूर्ण मॅरेथॉन, २ अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सफलता.

3. २०० किलोमीटर सायकलिंग, ५ किलोमीटर समुद्री जलतरण शर्यतीत बाजी.

शरीर थकले; पण... :

‘अर्धमॅरेथॉन माझ्यासाठी खूपच कठीण ठरली. धावताना पहिल्या चार किलोमीटरनंतर पोटरीचे स्नायू दुखू लागले. पुढे १० किलोमीटरनंतर गुडघा त्रास करू लागला; पण अर्ध्यावर थांबलो नाही. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर शर्यत पूर्ण केलीच.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar: "मी माहिती दिली, आता त्या 2 राजकारण्यांची चौकशी करा!", हल्ला प्रकरणी रामा काणकोणकर यांची पोलिसांकडे थेट मागणी

IFFI 2025: 'इफ्फी'च्या कार्यक्रमस्थळी गोमंतकीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार दिसायला हवे होते; परंतु चित्र मात्र अगदीच वेगळे..

Stray Dogs: शाळेच्या आवारात कुत्र्यांना खायला घालू नका! दुर्घटना टाळण्यासाठी निर्देश; विद्यालयांना कुंपण उभारण्याची सूचना

Goa Live News: बेतुल बंदर प्रकल्प कधीही होऊ देणार नाही; आमदार अल्टोन डी'कोस्टा यांचा निर्धार

Opinion: जानेवारीत गोयचो दौरो करप जालेंच, तर मेळूया गोयांनच! अट्टल गोंयकाराचे मराठी मन..

SCROLL FOR NEXT