Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: विधवांना चार हजार रुपये अनुदान; सुभाष फळदेसाईंनी दिली माहिती

Chief Minister Devdarshan Yojana: दोन महिन्यांत मुख्यमंत्री देवदर्शन योजना होणार सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गृहआधार योजनेच्या लाभासाठी विधवांना यापुढे अर्ज करण्याची गरज नाही. विधवा महिलेला २१ वर्षांखालील अपत्य असल्यास त्यांना चार हजार रुपये अनुदान मिळेल. मात्र, अपत्य २१ वर्षांचे झाल्यानंतर अडीच हजार रुपये मिळतील, अशी माहिती समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. येत्या दोन महिन्यांत मुख्यमंत्री देवदर्शन योजना सुरू होईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

अटल आसरा योजनेसाठी आलेल्या अर्जांमध्ये छाननी केली असता, फ्लॅटधारकही अर्ज करीत असल्याचे निष्पन्न झाले. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २९ कोटी रुपये खर्च केले आहेत. सध्याच्या अर्जांची पुन्हा छाननी केली जाईल. दीड लाखापर्यंत असलेल्या या मदतीची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवावी, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.

दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतून लाभार्थींना दोन हजार रुपये दिले जातात. सध्या ज्येष्ठ नागरिक ८४ हजार ४७३, निराधार महिला २,७००, विधवा ३८ हजार ६३, दिव्यांग ११ हजार ८४१, एचआयव्ही रुग्ण ४१८, बचपन योजनेखील ३६ मिळून १ लाख ३८ हजार १३१ लाभार्थी आहेत. २०२२-२३ मध्ये १ लाख ४० हजार लाभार्थी होते. त्यामुळे या योजनेखाली ३८१ कोटी ९० लाख, तर २०२३-२४ यावर्षी ३३३.६४ कोटी रुपये लाभार्थींना द्यावे लागणार आहेत, असे फळदेसाई म्हणाले.

९ कोटी निधी शिल्लक

फळदेसाई म्हणाले की, पीडित, दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम समाजकल्याण खाते करत आहे. केंद्र सरकारचा ९ कोटी निधी अजूनही शिल्लक असून, ओबीसी, एससी विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीचा विस्तार व्हावा, म्हणून काम केले जात आहे.

‘दयानंद’ योजनेचाही लाभ वाढणार

या योजनेसाठी सुमारे २९ कोटी रुपये दरमहा द्यावे लागतात. आता पाच हजार रुपये द्यायचे झाल्यास ही रक्कम दरमहा ६० कोटींपर्यंत जाईल. वर्षाला ती ७२० कोटींवर जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ही रक्कम वाढविण्याचा विचार केला जाईल, असे फळदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

SCROLL FOR NEXT