Goa Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: बार्देशात गेल्या दोन महिन्यांत 400 वाहन परवाने निलंबित

यावर्षी वाहतूक पोलिस व वाहतूक खात्याने उल्लंघनकर्त्यांचा वाहनचालक परवाना निलंबित करण्यावर भर दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वाहतूक खात्याच्या म्हापसा कार्यालयाकडून नवीन मोटार वाहन कायद्यान्वये बार्देशात सुमारे 950 चालकांचा वाहन परवाना निलंबित केला. तर यंदा चालू वर्षात गेल्या दोन महिन्यांत तब्बल 400 जणांवर कारवाईचा बडगा उगारला.

बार्देश तालुक्यात मागील एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत 542 वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर यावर्षी वाहतूक पोलिस व वाहतूक खात्याने सध्या उल्लंघनकर्त्यांचा वाहनचालक परवाना निलंबित करण्यावर भर दिला आहे. दरम्यान, राज्यात एप्रिल 2022 पासून नवीन मोटार वाहन कायदा अमलात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत म्हणजे 59 दिवसांत 400 वाहनचालकांचे परवाने निलंबित केले. या सरासरीनुसार दिवसाला सहा ते सात वाहनचालकांचे परवाने निलंबित झालेत.

नेटवर्कअभावी लोकांची गैरसोय...

1) म्हापसा येथील आरटीओ कार्यालयातील इंटरनेट सेवा बंद राहिल्याने मागील दोन दिवस येथे येणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय झाली व कामे खोळंबली. सूत्रांच्या माहितीनुसार, तांत्रिक समस्येमुळे राज्यातील इतरही सरकारी आस्थापनांत ही स्थिती उद्भवली होती.

2) सध्या आरटीओकडून सर्व सुविधा या ऑनलाइन केल्या आहेत. एकीकडे राज्य सरकार डिजिटलायझेशनच्या गप्पा मारते. मात्र, इंटरनेट सेवा अचानक ठप्प राहिल्याने लोकांची प्रचंड गैरसोय होते तसेच संबंधितांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.

3) यासंदर्भात आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी ठप्प झालेली इंटरनेट सेवा ही दुपारी तीन वाजल्यानंतर सुरळीत झाली. मंगळवारीदेखील अशीच समस्या उद्भवली होती. तांत्रिक मुद्दा असल्याने आम्हीदेखील हतबल असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT