वास्को: गेल्या गुरुवारी बुडालेल्या श्रीकृष्णा बार्जवरील चार कामगारांचा अद्याप शोध न लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी चिंता व्यक्त केली आहे. आठ-नऊ दिवस झाल्याने ते जीवित नसतील यासंबंधी आम्ही मन घट्ट केले आहे.
त्यामुळे निदान त्यांच्या मृतदेहांचा शोध तरी घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही बार्ज दहा कामगारांसह जयगडहून गोव्याकडे निघाली होती. त्या रात्री समुद्रात तुफान आल्याने बार्ज खोल समुद्रात बुडाली. याप्रकरणी माहिती मिळताच तटरक्षक दलातर्फे त्वरित शोधमोहीम हाती घेऊन पाचजणांना वाचवण्ायात आले होते.
जयगड बंदरातून गोव्याकडे जाणारी एक बार्ज दुर्दैवाने समुद्रात कोसळल्याने एका क्रू मेंबरचा मृत्यू झाला गेल्या आठवड्यात मृत्यू झाला आणि पाच बचावले होते. त्यापैकी चार क्रू मेंबर्स अजूनही बेपत्ता आहेत. गोवा तटरक्षक दलाचे अधिकारी अजूनही बचाव मोहीम राबवत आहेत.
जयगडहून गोव्यासाठी निघालेल्या दहा कर्मचाऱ्यांसह श्री कृष्णा ही बार्ज गुरुवारी बेपत्ता झाली. कोस्ट गार्ड गोवा डीआयजी ए बोस यांनी दिलेल्या माहितीनुसार तटरक्षक दलाने, घटनेची माहिती मिळताच, बचावकार्यासाठी वेगवेगळे पथके रवाना करण्यात आले. तटरक्षक दलाने ताबडतोब त्यांचे हेलिकॉप्टर (Helicopter) चेतक आणि तीन जहाजे बचाव आणि शोध मोहिमेसाठी कार्यरत केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.