Goa Anjunem Dam Dainik Gomantak
गोवा

Anjunem Dam: ९० मीटरची पातळी ओलांडली; ‘वाळवंटी’काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Valvanti River: भरती, ओहोटी व पावसाचा अंदाज घेऊन पाणी सोडण्यात येत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

केरीतील अंजुणे धरणाने ९० मीटरची पातळी ओलांडल्याने धरणाचे चारही दरवाजे आज मंगळ. दि. १६ जुलै रोजी सकाळी खुले करून पाणी सोडण्यात आले.

दरम्यान, प्रशासनाने वाळवंटी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या धरणाची पातळी ९०.७५ मीटर इतकी आहे. धरणाची एकूण पातळी ९३.२ मीटर आहे. वाळवंटी नदीला भरती, ओहोटी व पावसाचा अंदाज घेऊन पाणी सोडण्यात येत आहे. सध्या ५ सेंटीमीटर दरवाजे खोलण्यात आले आहेत.

गेल्यावर्षी २७ जुलै रोजी धरणाने ९० मीटरची पातळी ओलांडली होती. त्यामुळे त्याचदिवशी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले होते. यावर्षी ११ दिवस अगोदरच धरणाने ९० मीटरची पातळी ओलांडली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा मारा सुरूच आहे. भविष्यातील पावसाचा अंदाज घेऊन अतिरिक्त पाणी सोडण्यात येते. व धरणाची पातळी संतुलितपणे राखली जाते, असे धरणाचे सहाय्यक अभियंता दिलीप गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT