Damage due to rain Dainik Gomantak
गोवा

Wall Collapses In Borda: कुंपणाची भिंत पडून चार सदनिकांची हानी; घरांमध्ये मातीचा ढिगारा

गोमन्तक डिजिटल टीम

मागचे दोन दिवस पडत असलेल्‍या संततधार पावसामुळे दक्षिण गोव्‍यात कित्‍येक ठिकाणी भूस्‍खलनाचे प्रकार घडले असून आज सकाळी मार्ले-बोर्डा येथे एका बंगल्‍याची कुंपणाची भिंत लगतच्या एका इमारतीवर पडल्‍याने या इमारतीतील चार सदनिकांची मोठ्या प्रमाणावर मोडताेड झाली.

घरात लोक असताना ही पडझड झाली. मात्र, हा प्रकार सकाळच्‍या वेळेस झाल्‍याने घरातील लाेकांनी घराबाहेर धाव घेतल्‍याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मार्ले-बाेर्डा येथील रायेश चेंबर्स या इमारतीतील फ्‍लॅटवर ही दरड कोसळली. या दरडीबरोबर दगडी कुंपणही या इमारतीवर कोसळून पडल्‍याने या मातीच्‍या आणि दगडाच्‍या वजनाने फ्‍लॅटच्‍या भिंती कोसळल्‍या आणि मातीचा हा ढिगारा घरात शिरला. यातील एका सदनिकेच्‍या शयनकक्षाची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे.

तक्रारीकडे दुर्लक्ष

डोंगराच्‍या पायथ्‍याशी ही इमारत असून हा डोंगर कापून तिथे एक बंगला बांधण्‍यात आला होता. या बंगल्‍यासाठीच ही कुंपणाची दगडी भिंत उभारण्‍यात आली होती. ही भिंत कोसळू शकते, अशी तक्रार गतवर्षी १२ एप्रिल रोजी जिल्‍हा प्रशासनाकडे केली हाेती. मात्र त्‍याची दखल घेतली गेली नाही. परिणामी आम्‍हाला ही हानी सोसावी लागली, अशी तक्रार येथील रहिवाशांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT