RTI Workshop In Borda Goa: सुशासनासाठी माहितीचा अधिकार- एगना क्लिटस

एगना क्लिटस ः बोर्डा महाविद्यालयात ‘आरटीआय’वर कार्यशाळा
Workshop
WorkshopDainik Gomantak

RTI Workshop In Borda Goa माहिती अधिकार कायदा हे एक महत्त्वाचे साधन आहे. कारण ते देशातील नागरिकांना सार्वजनिक प्राधिकरणांना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देते.

कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर करायला हवा. नागरिकांनीही कायद्याचा जबाबदारीने वापर करून सुशासनासाठी प्रयत्न केले पाहिजेत,असे उपजिल्हाधिकारी एगना क्लिटस यांनी सांगितले.

वाणिज्य आणि अर्थशास्त्र सरकारी महाविद्यालय बोर्डा येथील गणित विभागातर्फे जनमाहिती अधिकारी (पीआयओ) आणि साहाय्यक जनमाहिती अधिकारी (एपीआयओ) यांच्यासाठी ‘आरटीआय २००५ च्या अंमलबजावणीतील प्रक्रियात्मक पैलू समजून घेणे’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Workshop
Justice Rohit Dev: कोर्ट सुरू असतानाच राजीनामा देणारे हाय कोर्टाचे न्यायाधीश, रोहित देव यांचे गोवा कनेक्शन माहित आहे का ?

गोवा सार्वजनिक प्रशासन आणि ग्रामीण विकास संस्थेच्या संचालक सीमा फर्नांडिस यांनी कायद्याची नेमकी माहिती करुन दिली आणि माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक प्रक्रियेचे स्पष्टीकरण दिले.

डॉ. फर्नांडिस यांनी सर्व संस्थांना माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ अन्वये स्वेच्छेने माहिती उघड करण्याचे आवाहन केले.

एकूण सव्वीस पीआयओ आणि एपीआयओ या कार्यशाळेत सहभागी झाले होते. सूत्रसंचालन सहयोगी प्राध्यापक, गणित विभागाचे प्रमुख तसेच महाविद्यालयाचे पीआयओ मिंगुएल अँटोनियो पी. कोस्टा मार्टिन्स यांनी केले.

एपीआयओ नयन शानबाग यांनी आभार मानले. संसाधन व्यक्ती- डॉ. फर्नांडिस आणि प्राध्यापक मार्टिन्स यांच्या हस्ते सहभागींना प्रमाणपत्रे देण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. सिफोनिया डिमेलो यांनी केले.

Workshop
Ravindra Bhavan Margao: प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी ! रवींद्र भवनचे कॅन्टीन लवकरच खुले होणार...

कामकाजावर लक्ष!

या कार्यशाळेत उपस्थितांना संबोधित करताना महाविद्यालयाचे प्राचार्य एफ. एम. नदाफ म्हणाले, आरटीआय हे अत्यावश्यक साधन आहे. यामुळे नागरिकांना प्रशासकीय कामकाजावर लक्ष ठेवता येते.

याशिवाय चैतन्यशील लोकशाहीसाठी माहितीचा अधिकार महत्त्वाचा आहे. कारभार पारदर्शक होण्यासाठीही आरटीआयचा उपयोग आवश्‍यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com